घरमुंबईवडिलांसाठी मुलाने सोडली उमेदवारी

वडिलांसाठी मुलाने सोडली उमेदवारी

Subscribe

ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक

वडील मुलांसाठी आपल्या जीवाचे रान करतात. वडील राजकारणात असतील त्यांनी आपल्या मुलाला हाताला धरून त्याला राजकारणात आणल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. प्रसंगी मुलाला तिकीट मिळावे म्हणून वडिलांनी माघार घेतल्याचेही आपण अनुभवले आहे. पण वडिलांसाठी मुलाने आपल्या करिअरला ब्रेक लावल्याची घटना घडली आहे. वडील गणेश नाईक यांना भाजपकडून तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांचा मुलगा संदीप नाईक यांनी त्यांना मिळालेले तिकीट आपल्या वडिलांना देत पुत्रधर्म पाळला आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करत बेलापूर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढण्याचे संकेत दिले होते. मात्र, मंगळवारी जाहीर झालेल्या भाजपच्या यादीत बेलापूरमधून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच पुन्हा तिकीट दिल्याने नाईक यांचा भाजपने गेम केल्याची चर्चा नवी मुंबईत होती. अखेर बुधवारी सकाळी गणेश नाईक यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या सर्व ४८ नगरसेवकांची बैठक बोलावली. त्यानंतरही भाजपकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने गणेश नाईक यांच्यासाठी त्यांचा मुलगा संदीप नाईक यांनी आपली विधानसभेची उमेदवारी सोडली आहे.

- Advertisement -

ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी त्यांना भाजपने देऊ केलेली उमेदवारी मागे घेत आपले वडील गणेश नाईक यांच्यासाठी मतदारसंघ सोडला. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास गणेश नाईक यांनी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यापूर्वी, भाजप प्रवेशावेळी गणेश नाईक यांना मंदा म्हात्रे यांच्याऐवजी विधानसभेचे तिकीट गणेश नाईक यांना दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, मंदा म्हात्रे यांनाच बेलापूरमधून उमेदवारी देत गणेश नाईक यांचा पत्ता कट करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -