घरदेश-विदेशकेरळमधील पूरग्रस्त प्राण्यांना गॅस्ट्रोची लागण

केरळमधील पूरग्रस्त प्राण्यांना गॅस्ट्रोची लागण

Subscribe

केरळ हे शेतीप्रधान राज्य असल्याने येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या गुरांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. यात बहुतांश गुरांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. मुंबईतील प्राणी मित्र मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

केरळमधील पुराचे पाणी आता ओसरु लागले आहे. मात्र पुराच्या पाण्याचा फटका नागरीकांसह तेथील प्राणी विश्वालाही बसला आहे. केरळ हे शेतीप्रधान राज्य असल्याने येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या गुरांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. यात बहुतांश गुरांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने पॉझ म्हणजेच प्लान्ट अँड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक निलेश भणगे यांनी सांगितले. केरळमध्ये सध्या सरकारी यंत्रणा, आर्मी, सामाजिक संघटना मदत करत आहेत. पुराचा फटका येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्याचप्रमाणे येथील पशू पक्ष्यांनाही बसला आहे. त्यामुळे जेव्हापासून पूराचं पाणी ओसारायला लागलं आहे. तेव्हापासून केरळ, बंगळुरू आणि इतर शहरातील संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था केरळमध्ये सध्या औषधांचा साठा पुरवत आहेत.

प्राण्यांसाठी औषधं, साहित्याचा साठा पाठवला जातोय 

मुंबईतील रॉ तसेच डोंबिवलीतील पॉझ संस्थेचे कार्यकर्ते केरळमधील कुर्ग या ठिकाणी मदतकार्य करत आहेत. केरळ ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल आणि बंगळुरूमधील क्युपा या दोन्ही संस्थांकडून आजारी प्राण्यांना औषधोपचार देत आहे. प्राण्यांना वेळेवर उपचार मिळावे त्यासाठी वेगवेगळ्या भागात शिबीरं लावण्यात आले आहेत. प्राण्यांच्या मदतीसाठी मुंबई, डोंबिवली तसंच कल्याण परिसरातील प्राणी मित्रांकडून मदत मिळवली जात आहेत. यात १५० किलो डॉग फूड, ५० किलो कॅट फूड, घोड्यांचे खाद्य तारपेलिन शिट्स, प्राथमिक उपचारांसाठी लागणारे साहित्य म्हणजेच डेटॉल, अडीच किलो हळद, बेटादिन, कॉटन, सलाईन आणि इतर लागणारी औषधे जमा करून गेल्या आठवड्यापासून पाठवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारी, २७ ऑगस्टला रॉ या संस्थेकडून पुन्हा एकदा साहित्य आणि औषधांचा साठा पाठवण्यात आला आहे. तसेच, पॉज संस्थेने दुसऱ्यांदा औषधांचा साठा पुरवला आहे. तर, गुरुवारी पुन्हा एकदा औषधांचा साठा केरळमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती निलेश भणगे यांनी दिली आहे.

- Advertisement -

आधी आमच्या संस्थेतर्फे १३० किलोपर्यंतचे प्राथमिक उपचारांचं साहित्य पाठवण्यात आलं होतं. केरळमध्ये जे पाणी साचलं त्यातून साथीचे आजार पसरण्याची भीती होती. त्यामुळे तेथील प्राण्यांनादेखील साचलेल्या पाण्याचा त्रास झाला आहे. यामुळे प्राण्यांना गॅस्ट्रोसारखे आजार बळावू शकतात. शिवाय, त्यांचं लसीकरण करण्याची गरज आहे. पाणी ओसारायला सुरूवात झाल्यानंतर आम्ही लगेचच तिथे मदत पाठवायला सुरूवात केली. शिवाय दोन दिवसांत आणखी २०० किलोचं डॉग फूड आणि ५० किलो कॅट फूड पाठवणार आहोत. तिथे जे पाळीव प्राणी, तसंच मांजरीची पिल्लं आहेत, त्यांना जास्त त्रास झाला आहे. शिवाय, तेथील फॉरेन डिपार्टमेंटही १०० टक्के कार्यरत आहेत. तसेच प्राणी अडकले असतील तिथेही रेस्क्यूचे काम सुरू आहे. बंगळुरूमधील क्यूपा, चेन्नईतील ल्यूक्रॉस, हैद्राबादमधील ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनल या संस्था सध्या तिथे प्राण्यांसाठी काम करत आहेत. दोन प्रकारे मदत केली जाते आहे. काही रक्कम जमा केली जात असून अनेक संस्था प्राथमिक उपचारांसाठी लागणारे साहित्य गोळा करुन देत आहेत.
– निलेश भणगे, संस्थापक, प्लान्ट अँड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -