घरमुंबईगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा रुग्णालयात दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा रुग्णालयात दाखल

Subscribe

काही महिन्यांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती मोठ्या प्रमाणावर खालावली होती. त्यासाठी त्यांनी आधी मुंबईत आणि नंतर अमेरिकेत ११ दिवस उपचार घेतले होते. अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर नुकतेच ते गोव्यात परतले होते. त्यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली होती.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पुन्हा एकदा मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळीच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तातडीने ते मुंबईत दाखल झाले. त्यांना जास्तच त्रास होत असल्यामुळे गोव्यातले भाजपाचे काही आमदारही त्यांना सोडण्यासाठी मुंबईत आल्याची माहितीही समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणावर खालावली होती. त्यासाठी त्यांनी आधी मुंबईत आणि नंतर अमेरिकेत ११ दिवस उपचार घेतले होते. अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर नुकतेच ते गोव्यात परतले होते. त्यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली होती.

स्वादुपिंडाच्या आजाराची ट्रीटमेंट

गेल्या काही महिन्यांपासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार सुरू आहेत. यासाठी आधी गोव्यातील मेडिकल कॉलेज, नंतर मुंबईतील लिलावती आणि शेवटी अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मार्च महिन्यामध्ये पर्रीकर अमेरिकेतील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले होते. तब्बल ३ महिने उपचार झाल्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते गोव्यात परतले होते.

- Advertisement -

नियमित तपासणीचा दावा

दरम्यान, मनोहर पर्रीकरांना नियमित तपासणीसाठीच रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांनी गोव्याच्या मेडिकल कॉलेजमध्येही उपचार घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

२५ ऑगस्टला परतणार गोव्याला

गोवा मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार मनोहर पर्रीकर लिलावतीमध्ये तपासणी झाल्यानंतर २५ ऑगस्टला म्हणजेच शनिवारी संध्याकाळी गोव्याला परतणार आहेत. तसेच, नियमित तपासणीसाठीच त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचंही सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -