घरमुंबईगणपतीसाठी कोकणवासीयांकरता खुशखबर

गणपतीसाठी कोकणवासीयांकरता खुशखबर

Subscribe

डबल डेकर एक्सप्रेस १८, तर तुतारी १९ डब्यांची होणार

गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांकरता एक खुशखबर आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने एसी डबल डेकर आणि तुतारी एक्सप्रेसच्या कोचच्या संख्येत तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.त्यानुसार आता डबल डेकर एक्सप्रेस १८ कोचची तर तुतारी एक्सप्रेस १९ कोचची चालविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात गर्दीपासून दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सवा दरम्यान कोकणात जाणार्‍या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. तसेच रेल्वेचे तिकीट न मिळाल्यामुळे अनेक चाकरमान्यांचा हिरमोड होतो. तसेच रेल्वेतर्फे गणेशोत्सवात चालविण्यात येणार्‍या विशेष गाड्यांचे आरक्षण याआधीच फुल्ल झालेले आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागतो. खासगी गाड्याचे चालक प्रवाशांकडून जास्त पैसे उकळतात.त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाने आपल्या दोन गाड्यांच्या कोचमध्ये वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ११०८५-११०८६ एलटीटी-मडगाव-एलटीटी एसी डबल डेकर एक्सप्रेसला आता टु टायर एसीचा एक, थ्री टायर एसीचे ९ तर चेअर कारचे ६ आणि जनरेटर कारचे २ असे एकूण १८ कोच असणार आहेत. २८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान हे अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.

- Advertisement -

सध्या ही ट्रेन ११ डब्यांची चालवण्यात येत आहे. ११००३-११००४ दादर-सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेसला आता टु टायर एसीचा एक, थ्री टायर एसीचा एक, स्लीपर क्लासचे ७,जनरल क्लासचे ८ सेकण्ड क्लासचे २ असे एकूण १९ कोच असणार आहेत. २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान हे अतिरिक्त कोच लावण्यात येणार आहेत. सध्या ही ट्रेन १५ कोचची चालविण्यात येत आहे. याशिवाय २२११३-२२११४ एलटीटी-कोच्चुवेल्ली-एलटीटी एक्सप्रेस कायमस्वरुपी एलएचबी कोचची चालविण्यात येणार आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -