घरमुंबईपरळच्या मोनोरेल स्थानकाला हाफकिन संस्थेचं नावं द्या!

परळच्या मोनोरेल स्थानकाला हाफकिन संस्थेचं नावं द्या!

Subscribe

हाफकिन संस्थेचा ११९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. तसेच परळ परिसरात होणाऱ्या मोनोरेल स्थानकाला हाफकिनचे नाव देण्यात यावे, अशी मागणी संचालिकांनी केली.

परळच्या हाफकिन संस्थेचा शुक्रवारी ११९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. शिवाय, हाफकिन या संस्थेने आतापर्यंत कोणकोणत्या संशोधनावर भर दिला आहे किंवा आणखी कोणकोणते प्रकल्प यापुढे राबवले जाणार आहेत? याविषयी माहिती देण्यात आली. हाफकिन ही संस्था गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करत आहे. त्यामुळे हाफकिनचं नाव सर्वांना कळावं याकरता परळ परिसरात बांधण्यात येणाऱ्या मोनोरेल स्थानकाल हाफकिनचं नाव देण्यात यावं, अशी मागणी हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. निशिगंधा नाईक यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यानुसार तसं पत्र गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलं आहे.

संसर्गजन्य आजारांवर हाफकीनचं काम सुरू

या कार्यक्रमादरम्यान अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. देशात ७० टक्के मृत्यू हे संसर्गजन्य आजारातून होतो. त्यावरही हाफकिन संस्था काम करत आहे. मधुमेह, कर्करोग, एपीलेप्सी या आजारांवरही हाफकिन काम करत आहे. इन्फ्लूएन्झा याविषयी काम करण्याची जबाबदारीही या संस्थेवर सोपावण्यात आली आहे. नवीन औषधं, नवीन डोस निर्माण करण्याचं काम केलं येथे जात आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय विष संशोधन केंद्र

दर  साडेदहा मिनिटाच्या अंतराने एक व्यक्ती सर्पदंशाने मृत्यूमुखी पड‌तो. त्यामूळे जगभरात सर्पदंशातून मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यासाठीच काही वर्षात राष्ट्रीय विष संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार आहे, असल्याचं या कार्यक्रमादरम्यान हाफकिन संस्थेच्या संचालिकांनी सांगितलं.

 National Toxic Research Center
राष्ट्रीय विष संशोधन केंद्र

आजही आदिवासी पाड्यात साप चावला की दुर्लक्ष केलं जातं. पण, असं करणं खरंच जीवावर बेतू शकतं. शिवाय, डॉक्टर ही अनेकदा अशा केसेस ना हात लावायला घाबरतात. कारण, ग्रामीण भागात डॉक्टरांमध्ये ही कशी ट्रिटमेंट करावी यांची माहिती नसते. त्यातून सर्पदंशाने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आजही ग्रामीण भागात वाहतूकीची व्यवस्था नसल्याने प्राथमिक उपचार केंद्रावर पोहचे पर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो. मुंबईत ही उपचार योग्य वेळेवर न मिळाल्याने मृत्यू होत आहेत. त्यामुळे सरकार सोबत सर्वांमध्येच जनजागृती झाली पाहिजे.
– डॉ. हिंमतराव बावस्कर, सर्पतज्ज्ञ

या कार्यक्रमाला पद्मभूषण डॉ. आर. डी. लेले, डॉ. हिंमतराव‌ बावस्कर, तिन्ही पालिका रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे आणि हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. निशिगंधा नाईक हे मान्यवर उपस्थित होते.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -