घरमुंबईCorona: मुंबईतील आणखी १२ पोलीस अधिकाऱ्यांना संसर्ग; ५४ कर्मचाऱ्यांना केलं क्वारंटाइन

Corona: मुंबईतील आणखी १२ पोलीस अधिकाऱ्यांना संसर्ग; ५४ कर्मचाऱ्यांना केलं क्वारंटाइन

Subscribe

जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील १२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ६ पोलीस अधिकारी आणि ४० पोलिसांना क्वारंटाइन

कोरोना सारख्या जीवघेण्या परिस्थितीत देखील योद्धांप्रमाणे आपले कर्तव्य चोख बजावताना पोलीस कर्मचारी दिसताय. या कोरोनाच्या लढाईत पोलिसांची महत्त्वाची भूमिका आहे. गरजूंना मदत करण्यापासून ते नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चोप देण्यापर्यंत पोलिसांचा अनेक लोकांशी संपर्क येत असतो. अशा परिस्थितीत सतत लोकांच्या संपर्कात आल्याने मुंबई मधल्या आणखी १२ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, राज्यात ३८५ पोलीस कर्मचारी कोरोना बाधित असून त्यापैकी ३५ पोलीस अधिकारी तर ३५० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता आणखी जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील १२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ६ पोलीस अधिकारी आणि ४० पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. १८ जण हे ५५ वयोगटातील असल्याने त्यांनी रजेवर पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

या १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या ५४ कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यापैकी सर्व पोलीस जे जे मार्ग पोलीस स्टेशनचे पीएसआय आणि पीआय दर्जाचे अधिकारी असल्याने जे जे पोलीस स्टेशन सॅनिटाईज करण्यात आले आहे.


Corona: पुण्यात कोरोनाने घेतला पोलीस अधिकाऱ्याचा बळी; आतापर्यंत राज्यात ४ जणांचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -