घरमुंबईखारघर मध्ये मृत कावळ्यांच्या संख्येत वाढ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

खारघर मध्ये मृत कावळ्यांच्या संख्येत वाढ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Subscribe

गेल्या चार दिवसात खारघर मध्ये चार कावळे नागरिकांच्या मृत अवस्थतेत निदर्शनास आले.

खारघर मध्ये मृत कावळ्याचा संख्येत भर पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या चार दिवसात खारघर मध्ये चार कावळे नागरिकांना मृत अवस्थतेत निदर्शनास आले. खारघर वसाहतीप्रमाणे परिसरात कावळे मृत अवस्थेत पडून असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. कोरोना या महामारीचे संकट असताना अनेक राज्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

खारघर सेक्टर 19 मधील पोलीस समिश्र सोसायटीच्या आवारात गुरुवारी एक कावळा मृतावस्थेत आढळून आला होता. तर जानेवारी महिन्यात सेक्टर १९ मध्ये बिना गोगरी यांच्या शाश्वत फाउंडेशन कार्यालया समोर मृत अवस्थेत कावळे  आढल्याने गोगरी यांनी तात्काळ पालिका अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. तर सोमवारी रस्त्यावर दोन कावळे मृत अवस्थेत आढळले होते.

- Advertisement -

महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिराकव झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. २००६ साली महाराष्ट्रात बर्ड फ्लू आला होता. मात्र त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आता कोरोनाचे संकट असल्याने जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असे पशुमंत्र्यांनी सांगतिले आहे.


हेही वाचा – महाराष्ट्रात बर्ड फ्लू आलाय, पशुसंवर्धन मंत्री म्हणतात ‘हे’ करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -