घरमुंबईलेक शिकवा अभियान राबवण्याचे शाळांना निर्देश

लेक शिकवा अभियान राबवण्याचे शाळांना निर्देश

Subscribe

राज्यातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, मुलींच्या शिक्षणाला गती देणे, मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि शाळाबाह्य मुलींना मुख्य प्रवाहात आणता यावे या उद्देशाने राज्यातील सर्व शाळांमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 ते 26 जानेवारीदरम्यान ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान’ राबवण्यात येते. सलग दोन वर्षे या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यावर्षीही विद्या प्राधिकरणामार्फत हे अभियान राबवण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत. उपक्रमाचा कृती कार्यक्रम विद्या प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आला आहे.

‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियाना’ला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. यावेळी सावत्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राचा परिचय विद्यार्थ्यांना करून देणे, प्रभातफेरी, पथनाट्याच्या माध्यमातून गावांमध्ये मुलींच्या शिक्षणाबद्दल जनजागृती करणे, शाळाबाह्य मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांची यादी जाहीर करणे, ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ या विषयावर कर्तृत्ववान महिलांची मुलाखत, चित्रकला, रांगोळी, भित्तीपत्रक, निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

- Advertisement -

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाबाबत जागृती करण्याबरोबरच त्यांच्यासाठी व्यावसायिक मार्गदर्शन आयोजित करणे, महिलांना ‘गुड टच, बॅड टच’ संदर्भात मार्गदर्शन, स्वसंरक्षणासाठी कराटे, ज्युडोचे प्रात्यक्षिक व त्याची माहिती मुलींना करून देणे तसेच विशाखा परिषद व पोक्सो कायद्याची माहिती देणे अशा कार्यक्रमांचा कृती कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. हे सर्व कार्यक्रम 3 ते 26 जानेवारीदरम्यान घेण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण)यांना देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -