घरमुंबईभाजपला पाठिंबा देऊन पायावर कुर्‍हाड मारून घेतली - जितेंद्र आव्हाड

भाजपला पाठिंबा देऊन पायावर कुर्‍हाड मारून घेतली – जितेंद्र आव्हाड

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सध्या अनेक नेते पक्षांतर करत आहेत. याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, राज्यात सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या बेरोजगारीतूनच स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेरोजगार एका पक्षातून दुसर्‍या पक्षात स्थलांतरीत होत आहेत. बेरोजगारी इतकी वाढली की सत्ताधारी पक्षात जाऊन अगदी भांडी घासायचीही नेत्यांची तयारी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्ष सोडणार्‍यांवर टीका केली.

माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २०१४ साली भाजपला पाठिंबा देऊन स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली. आमच्या नेत्यांनी स्वतःसाठी पवारांचे नाणे विकण्याचा प्रयत्न केला. माझ्या पक्षात मला निर्णय प्रक्रियेत आजही समाविष्ट करुन घेतले जात नाही. हे माझे दुर्दैव आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद आव्हाड यांनी व्यक्त केली.
मंगळवारी झालेल्या मायमहानगरच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सध्या अनेक नेते पक्षांतर करत आहेत. याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, राज्यात सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या बेरोजगारीतूनच स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेरोजगार एका पक्षातून दुसर्‍या पक्षात स्थलांतरीत होत आहेत. बेरोजगारी इतकी वाढली की सत्ताधारी पक्षात जाऊन अगदी भांडी घासायचीही नेत्यांची तयारी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्ष सोडणार्‍यांवर टीका केली.

‘पिचड स्वार्थासाठी भाजपात गेले’

मधुकर पिचड यांना ४० वर्षात साहेबांनी काय नाही दिले? पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले. १९९५ साली विरोधात असताना देखील पिचड यांना विरोधी पक्षनेतेपद दिले होते. आज पक्ष सोडताना, “पवार साहेबांनी खूप काही दिले, मात्र जनतेसाठी आता भाजपमध्ये जात आहे.”, असे वक्तव्य पिचड यांनी निव्वळ स्वार्थासाठी, सत्तेच्या भुकेपाई केले असल्याची टीका आव्हाड यांनी केली.

- Advertisement -

‘पवार उभ्या आयुष्यात शिवसेना-भाजपला पाठिंबा देणार नाहीत’

सचिन अहिर यांनी अचानक पक्ष सोडल्यामुळे बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. याबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले की, सचिन अहिर पक्ष सोडणार आहेत, हे आधीच माहीत झाले असते तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता. अहिर यांच्यानंतर मुंबई अध्यक्षपदाबाबत उशीर झाल्याबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिले. मुंबई अध्यक्षपदाच्या बाबतीत चार ते पाच नावे चर्चेत आहेत. त्यावर चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. कारण आजपर्यंत ज्यांच्या खांद्यावर जबाबदारीचे खांब टाकले होते, त्यांनीच ते पाडले. त्यामुळे आता जबाबदारी देताना विचार करुनच जबाबदारी दिली जाईल. त्यामुळेच मुंबई अध्यक्षपद जाहीर करण्यासाठी वेळ लागत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. पवार हे मनापासून धर्मनिरपेक्ष आहेत. ते उभ्या आयुष्यात शिवसेना-भाजपला पाठिंबा देणार नाहीत, असेही ते म्हणाले.


हेही वाचा – ‘पुरी दुनिया बोले, चौकीदार है चोर’; जितेंद्र आव्हाडांचे गाणं व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -