कंगनाची BMC कडे २ कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमकीच्या दरम्यान कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर महापालिकेने हातोडा मारला. मुंबई महापालिकेने कंगनाच्या वांद्रे येथील पाली हिल स्थित कार्यालयावर कारवाई केली असून आता कंगनाने नुकसानभरपाईचा दावा केला आहे. कंगनाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत पालिकेकडे २ कोटी रुपयांची मागणी केली आहे. तिने संशोधित याचिका हायकोर्टात दाखल केली असून या याचिकेवर २२ सप्टेंबर रोजी कोर्टात सुनावणी होणार आहे.

मुंबई महापालिकेने कंगनाच्या ज्या कार्यालयावर कारवाई केली त्यांची किंमत ४८ कोटी रुपये असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून कंगना रनौत आणि खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. कंगनाने अनेकदा ट्विटर पोस्ट आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपली परखड मते मांडली. तसेच तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. दरम्यान, पालिकेने तिच्या कार्यालयावर कारवाई केली असून ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत आली असता तिने कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर कंगनाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. तसेच कंगना पुन्हा मनालीला निघून गेली.

हेही वाचा –

‘चीनने लडाखमधील ३८ हजार चौरस किलोमीटर जमीन बळकावली’