‘चीनने लडाखमधील ३८ हजार चौरस किलोमीटर जमीन बळकावली’

China Has Occupied Over 38,000 Sq Km of Indian Land In Ladakh & Arunachal: India Govt
'चीनने लडाखमधील ३८ हजार चौरस किलोमीटर जमीन बळकावली'

पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील भारत आणि चीनी सैन्य यांच्या सुरू असलेल्या संघर्षाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत माहिती दिली. भारताची लडाखमधील ३८ हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन अधिकृतपणे चीनने हिसकावली असल्याचे आज समोर आले आहे. याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत भारत-चीन सीमेवरील तणावासंदर्भात माहिती देताना सांगितले.

राजनाथ सिंह म्हणाले की, चीनने भारतातील लडाखमधील ३८ हजार स्क्वेअर किलोमीटर जमिनीवर अनधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. तसेच याशिवाय १९६३ मध्ये तथाकथित सीमा करारानुसार पाकिस्तानाने पीओकेमधील ५ हजार १८० स्क्वेअर किमी जागा बेकायदेशीर रित्या चीनकडे सोपवली आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली आहे.

तसेच पुढे संरक्षणमंत्री म्हणाले की, ‘भारत-चीन सीमा प्रश्न हा एक जटिल मुद्दा आहे. याबाबत भारत आणि चीनने दोघांनी औपचारिकरित्या मान्य केले आहे. सीमेचा मुद्दा सोडवण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे. या मुद्याचे शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून निष्पक्ष, परस्पर सहमतीने समाधान निघू शकते. दरम्यान १९९३ आणि १९९६ मध्ये झालेल्या करारात एएलएसी जवळ दोन्ही देश सैन्याची तैनाती कमी ठेवतील असा उल्लेख केला आहे. जोपर्यंत सीमा प्रश्नावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत एएलसीचा आदर ठेवायचा. तसेच करारात उल्लंघन करायचे नाही’, असे देखील म्हटले आहे.


हेही वाचा – ‘तर आता जाईल २० कोटी लोकांची रोजीरोटी’, तरी मोदीजी गप्प का?