घरमुंबईकसारा प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी

कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी

Subscribe

शहापूर तालुक्यातील कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य विभाग चर्चेत आला आहे. कसार्‍यात आरोग्य सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा दिपाली पाटील यांना आरोग्य यंत्रणेच्या डळमळीत कारभाराचा अनुभव आला. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना तालुका प्रमुख मारुती धिर्डे, माजी जि.प.सदस्य जयराम बेंडकुळे, स्वीय सहाय्यक किशोर शेलवले उपस्थित होते.

जिल्हा परिषद अध्यक्ष पद रिक्त झाल्यानंतर दिपाली पाटील यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारून पंधरा दिवसच उलटून कुठे जात नाही तर दिपाली पाटील यांनी दुर्गम भागातील आरोग्य सुविधांची पाहणी करण्याच्या उद्देशाने रविवारी कसारा आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान डॉक्टर व कर्मचार्‍यांची वानवा, नवीन इमारतीला लागलेली गळती, साहित्यांचा तुटवडा अशा विविध समस्यांचा पाटील यांना अनुभव आला. शिवाय औषध भांडाराला कुलूप असल्याचे पाहायला मिळाले. यावर कार्यरत असलेल्या डॉक्टरांना विचारणा केली असता चावी हरवते म्हणून औषध निर्माते चावी घरी घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाटील यांनी आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. तसेच जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना फोनद्वारे संपर्क साधून कसारा आरोग्य यंत्रणेचा कारभार सुधारण्याचे आदेश दिले. तसेच इथल्या गैरहजर कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्याचा लेखी शेरा बाह्य रुग्ण कक्षाच्या दफ्तरी मारून निघून गेल्या.

- Advertisement -

आरोग्य विभागाच्या असुविधांच माहेरघर आहे. त्यामुळे इतर सोयीसुविधांविषयी काय बोलणार? याबाबत जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना कारवाई करण्यास सक्तीचे आदेश देण्यात येतील.
-दिपाली पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद, ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -