हार्बर रेल्वे विस्कळीत; कुर्ला – टिळकनगर दरम्यान वाहतूक विस्कळीत

कुर्ला ते टिळकनगर स्टेशनदरम्यान रुळाला तडे गेल्याकारणाने हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. हार्बर रेल्वेवरील वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे.

Mumbai
kurla tilak nagar between problem harbour railway local service disrupted
हार्बर रेल्वे विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला ते टिळकनगर दरम्यान रुळाला तडे गेल्या कारणाने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे हार्बर रेल्वेवरील वाहतूक १५ ते २५ मिनिटं उशिराने सुरू आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे, मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली आहे. हार्बर स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here