घरमुंबईमोनोरेलच्या १७ स्टेशनवर पायाभूत सुविधांचा अभाव

मोनोरेलच्या १७ स्टेशनवर पायाभूत सुविधांचा अभाव

Subscribe

 एमएमआरडीए कमतरता दूर करण्यासाठी सक्रिय

मोनोरेलच्या चेंबूर ते संत गाडगे महाराज मार्ग (महालक्ष्मी) या मार्गावर १७ स्टेशनवर प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुढाकार घेणार आहे. मोनोरेल स्टेशनला कमतरता असणार्‍या सुविधांमध्ये प्रवाशांना शौचालय, पिण्याचे पाणी तसेच स्टेशनवर आसन व्यवस्था यासारख्या सुविधांची कमतरता प्रामुख्याने समोर आली आहे. याच सुविधांच्या अनुषंगाने सर्व स्टेशनवर प्रवाशांसाठी अधिकाधिक सुविधा देण्यासाठी मोनोरेलसाठी एमएमआरडीएची हालचाल सुरू झाली आहे.

सध्या प्रत्येक स्टेशनवर प्रामुख्याने शौचालयाची सुविधा देण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. कारण सध्या स्टेशनमध्ये शौचालयाची सुविधा ही स्टेशन अंतर्गत काम करणार्‍यांसाठीच आहे. त्यामुळेच स्टेशन परिसरात शौचालय उभारण्यासाठी काय व्यवस्था करण्यात येईल याचा विचार एमएमआरडीएकडून सुरू आहे. मोनोरेलची बहुतांश स्थानके ही फुटपाथवर उभारण्यात आली आहेत. त्यामुळेच या परिसरात मल:निसारण वाहिन्यांची उभारणी करण्यापासूनचे आव्हान मोनोरेल प्रशासनासमोर आहे. सध्या मोनोरेलच्या चेंबूर ते महालक्ष्मी मार्गावर सरासरी २५ हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. त्यामध्ये महिला, जेष्ठ नागरिक तसेच शाळकरी मुलांसह चाकरमान्यांचाही समावेश आहे. म्हणूनच या प्रवाशांच्या दृष्टीने मोनोरेल स्थानकात शौचालयाची सुविधा देण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.

- Advertisement -

स्टेशन परिसरात सध्या आसन व्यवस्था नाही. सरासरी १५ ते २० मिनिटांनी होणार्‍या मोनोरेलच्या फेर्‍या पाहता अनेक प्रवाशांकडून आसन व्यवस्थेसाठी ही मागणी होत आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणेही प्रवाशांच्या सोयीसाठी गरजेचे असल्याचे एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. सध्या स्टेशन परिसरातील स्वच्छता हे आमच्यासमोर मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. स्टेशन खालील परिसर हा महापालिकेच्या हद्दीत असल्याने अनेक ठिकाणी स्टेशन परिसरात अस्वच्छता आढळत आहे. याबाबतही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -