घरमुंबईलता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर

Subscribe

लतादीदी यांची प्रकृती आता ठीक असून लवकरच त्या पूर्णपणे बऱ्या होतील आणि घरी येतील, असे त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी सोमवारी, पहाटे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ब्रीच कँडी रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉ. फारोख ई उदवडिया (Dr. Farokh E Udwadia) यांच्या मार्गदर्शनाखाली लता मांगेशकर (वय ९०) यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, लतादीदी यांची प्रकृती आता ठीक असून लवकरच त्या पूर्णपणे बऱ्या होतील आणि घरी येतील. या बातमीमुळे नक्कीच लतादीदींच्या चाहत्यांना दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

काय आहे एएनआय ट्विटमध्ये 

लतादीदी यांची प्रकृती आता स्थिर आहे. पहिल्यापेक्षा तब्येतीत खुप सुधारणा आहे. तुमच्या प्रार्थनेबद्दल खुप खुप धन्यवाद. त्या लवकरच बऱ्या व्हाव्यात आणि घरी याव्या, याचीही आम्ही वाट बघत आहोत. तुम्ही दिलेली साथ ही मौल्यवान आहे. दरम्यान, सामान्य चाहत्यांपासून बॉलीवूडकरांपर्यंत सर्वांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीसुद्धा लता दीदींना पत्रं लिहिलं आहे. ‘तुमच्या प्रकृतीविषयी कळताच मला काळजी वाटली. मी आशा करतो की, तुमची प्रकृती लवकरच पूर्वपदावर येईल’, असं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -