घरमहाराष्ट्र'...हे अतिशय चिंताजनक'; राष्ट्रपती राजवटीवर छ. संभाजी महाराजांची प्रतिक्रिया

‘…हे अतिशय चिंताजनक’; राष्ट्रपती राजवटीवर छ. संभाजी महाराजांची प्रतिक्रिया

Subscribe

‘महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागते हे अतिशय चिंताजनक आहे’, असे खासदार छत्रपती संभाजी महाराज म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे महाराषट्रातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणारी ही तिसरी वेळ आहे. याअगोदरही काही काळासाठी २०१४ साली आणि १९८० साली राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर काल तिसऱ्यांदा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीचे शिपारसपत्र केंद्रात पाठवले होते. या शिफारस पत्राला संमती मिळाली आणि महाराष्ट्रात अधिकृतपणे राष्ट्रपती राजवट लागू झाली.


हेही वाचा – राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेला झटका

- Advertisement -

नेमके काय म्हणाले संभाजी महाराज?

‘आज स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडवर होतो आणि आत्ताच माझ्याकडे बातमी आली की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागते हे अतिशय चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सर्वच पक्षांना अत्यंत विश्वासाने मतदान करून जनादेश दिला आहे. त्या लोकभावनेचा आदर केला गेला पाहिजे. आज महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटातून जातोय. अनेक कारणांमुळे युवक नैराश्यात आहेत. अनेक प्रश्न राज्यासमोर आ वासून उभे असताना ही राजकीय अस्थिरता परवडणारी नाही. राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढावा आणि स्थिर सरकार स्थापन करुन लोकाभिमुख राज्यकारभार करावा’, असे संभाजी महाराज म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -