घरमनोरंजनगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राज्यपालांचं पत्रं

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राज्यपालांचं पत्रं

Subscribe

सामान्य चाहत्यांपासून बॉलीवूडकरांपर्यंत सर्वांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीसुद्धा लता दीदींना पत्रं लिहिलं आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दीदींना रुग्णालयात दाखल करताच सर्वांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी करण्यास सुरुवात केली. सामान्य चाहत्यांपासून बॉलीवूडकरांपर्यंत सर्वांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीसुद्धा लता दीदींना पत्रं लिहिलं आहे.

काय लिहिलयं पत्रात?

‘तुमच्या प्रकृतीविषयी कळताच मला काळजी वाटली. मी आशा करतो की, तुमची प्रकृती लवकरच पूर्वपदावर येईल’, असं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.

- Advertisement -

लता दीदींना श्वसनाचा त्रास

रविवारी रात्री उशीरा श्वसनाच्या त्रासामुळे लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगेशकर कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -