घरमुंबईआणि त्यांना मृत्यूने गाठले!

आणि त्यांना मृत्यूने गाठले!

Subscribe

सोमवारी शस्त्रक्रियेआधीच आसाराम मगरे यांना कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या धुराने गाठले. आसाराम मगरे खाटवरुन पडल्याने त्यांना दुखापत झाली होती. त्यावर उपचार सुरु असताना रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचे ठरले.

आसाराम मगरे यांची पायाची शस्रक्रिया होणार होती. शस्त्रक्रियेसाठी तारखांवर तारखा पडत होत्या. दरम्यान सोमवारी शस्त्रक्रियेआधीच आसाराम मगरे यांना कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या धुराने गाठले, असे आसाराम मगरे यांचा मुलगा आनंद मगरे यांनी सांगितलं. अतिदक्षता विभागात ते दाखल असल्याने मगरे यांचे नातेवाईक प्रतीक्षा कक्षात वाट पाहत होते. त्यानंतर काही काळाने आनंद मगरे यांना आपले वडील आसाराम मगरे यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले.

नेमकं काय आहे प्रकरण?

आसाराम मगरे हे पवई येथील महात्मा फुले येथे राहत होते. मुलाच्या कामगार राज्य विमा योजनेमुळे ते या रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या कंबरेला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे शस्त्रक्रिया होणार होती. आसाराम मगरे खाटवरुन पडल्याने त्यांना दुखापत झाली होती. त्यावर उपचार सुरु असताना रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. मात्र‌ शस्त्रक्रियेला तारखा मिळत नव्हत्या. सोमवारी शस्त्रक्रीयेची पूर्व तयारी म्हणून त्यांच्या छातीतील कफ काढण्याची प्रक्रिया सुरु होती. त्याचवेळी एअरपोर्टवर कामाला असलेल्या आनंद मगरे यांना अचानक दुपारी कामावर फोन आला. कामगार रुग्णालयात आग लागली असल्याचे कळल्यावर आनंद मगरे रुग्णालयाच्या दिशेने धावत सुटले.

- Advertisement -

सेव्हेन हिल्स रुग्णालयात दाखल केले

आग लागली त्यावेळी रुग्ण आसाराम मगरे यांच्यासोबत त्यांचे जावई होते. रुग्णांना हलवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार रुग्ण आसाराम मगरे यांना सेव्हेन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना धुराचा गंभीर त्रास झाला होता. दरम्यान आसाराम मगरे यांचा मृत्यू झाल्याचे आनंद मगरे यांना डाॅक्टरांकडून समजले, असे मगरे यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

आईला एकदा बघण्यासाठी अजून थांबलो आहे – अनिल सागळे

या भीषम आगीत १४७ जण जखमी झाले आहेत. तर ६ जणांचा जीव दगावला आहे. यापैकी एका रुग्णाचे नातेवाईक अनिल सागळे आपलं महानगशी बोलताना म्हणाले की, आईला एकदा बघण्यासाठी अजून थांबलो आहे, असे म्हणाले आहेत. ७० वर्षीय कौशल्या सागळे यांना अंधेरीच्या होली स्पिरीट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे. अनिल सागळे आणि त्यांचे कुटुंबिय कामगार हॉस्पिटलमध्ये दिपक जाधव या त्यांच्या नातेवाईकांना बघायला गेले होते. पण, आग लागली असल्याचं कळताच सर्व धावधाव सुरू झाली. आम्ही सर्व धावत होतो. अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. चौथ्या मजल्यावरुन खाली येण्यासाठी त्यांनी रश्शी सोडली होती. त्यावरुनच आम्ही खाली उतरत होतो. पण, आईचा हात रश्शीतून सुटला आणि ती खाली पडली. त्यानंतर खूप धूर झाला होता. काहीच दिसत नव्हतं. त्याच धूरात आम्ही आईला आणि माझ्या बहिणीला शोधत होतो. आई आणि बहिण आशा‌ वालेकर या दोघीही‌ सध्या होली स्पिरीटमध्ये उपचार घेत आहेत. सागळे हे कुटुंबिय गोरेगाव येथे राहतं.

- Advertisement -

हेही वाचा – मुलीच्या मृत्यूला डॉक्टर आणि महापालिकाच जबाबदार !

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -