घरमुंबई६५ वर्षीय व्यावसायिकाने वृद्ध पत्नीची हत्या करत केली आत्महत्या

६५ वर्षीय व्यावसायिकाने वृद्ध पत्नीची हत्या करत केली आत्महत्या

Subscribe

दक्षिण मुंबईमध्ये एका वृद्ध व्यक्तीने आपल्याच पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पत्नीसोबत होणाऱ्या सततच्या भांडणाला कंटाळून ६५ वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, त्याने आपल्या ६० वर्षीय पत्नीची हत्या करून त्यानंतर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दक्षिण मुंबईतील चिरा बाजार परिसरात घडली आहे. या घटनेने दक्षिण मुंबईत खळबळ उडाली असून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीय या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. आनंद माखीजा (६५) आणि कविता माखीजा (६०) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. मखीजा यांनी खरंच आत्महत्या केली की ही हत्या आहे, यासंदर्भात देखील पोलीस तपास करत आहेत.

दम्याच्या त्रासामुळे केली हत्या?

माखीजा यांचे चेंबूर परिसरात फर्निचरचे शो-रूम असून त्यांना एक मुलगी आहे. पत्नी कविताला दम्याचा त्रास होता. तिच्या आजारपणावरून माखीजा दाम्पत्यात सतत भांडणे होत होती. सततच्या भांडणाला कंटाळून गुरुवारी मुलगी घराबाहेर गेली असता आनंद यांनी राहत्या घरात पत्नीच्या छातीत पोटात चाकूने वार करून स्वत: राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली.

- Advertisement -

आत्महत्या की हत्या? तपास सुरू

गुरुवारी संध्याकाळी, पोलिसांना कंट्रोल रुममधून फोन आला. मोबाइल पोलीस व्हॅन घटनास्थळी पोहोचली असता आनंद माखीजा रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचं पोलिसांना दिसलं. त्यांना जी टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पत्नी कविता यांचाही मृतदेह जीटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. याविषयी पोलीस अधिक तपास करत असून ही आत्महत्या आहे कि हत्या याचा अजून तपास लागलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -