मराठी भाषा दिनी बेस्टचं मुंबईकरांना इंग्रजीतून आवाहन

Mumbai
marathi bhasha din best appeal for mumbaikar in english by ease of living 2019 survey
मराठी भाषा दिनी बेस्टचं मुंबईकरांना इंग्रजीतून आवाहन

अनेक वर्षांचा मराठी भाषेला इतिहास लाभलेला आहे. मराठी भाषेचे साहित्य, संस्कृती आणि इतिहास हा खुप मोठा आहे. खऱ्या अर्थाने मराठी भाषा ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. आपण सर्वांनी मिळून मराठी भाषा जपली पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी जे जे करावे लागेल, ते ते सर्व करेन, असं एकीकडे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत दिलं. मात्र दुसरीकडे मुंबई महापालिकेची भाग असलेल्या बेस्ट उपक्रमाविषयी कंडक्टर एका सर्वेक्षणाच्या निमित्ताने मुंबईकरांना इंग्रजीतून आवाहन करत आहे. मराठी भाषा दिनी कंडक्टर इंग्रजी भाषेतून आवाहन करत असल्यामुळे सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बुधवारी राज्यातील सर्व मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याबाबतच्या विधेयकाला विधानपरिषदेत एकमताने मंजुरी देण्यात आली. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी हे विधेयक विधानपरिषदेत मांडले होते. या विधेयकाच्या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते. मराठी भाषा सक्तीची केली जात असली तरी त्यातून आम्हाला इतर भाषेचा दुस्वास करायचा नसल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. ज्याप्रकारे कर्नाटकातील बेळगाव येथे मराठी भाषिकांवर कानडीची सक्ती केली जात आहे. त्याप्रकारची सक्ती आम्हाला करायची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आदेश पाळला नाहीतर १ लाखाचा दंड

मराठी भाषा विषय सक्तीचा न करणार्‍या इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर आता दंड ठोठावला जाणार आहे. हा दंड १ लाख रुपयांच्या जवळपास असणार आहे. याबाबतचे विधेयक विधान परिषदेत बुधवारी एकमताने मंजूर करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्व शाळांना अधिनियमाचे पालन करावे लागेल. उल्लंघन करणार्‍या शाळाप्रमुखांना १ लाख रुपये दंडाची तरतूद या विधेयकात आहे.


हेही वाचा – मराठी भाषा दिनासाठी फक्त मुख्यमंत्रीच वेळेवर हजर, मंत्री-विरोधी पक्षनेते लेट!