घरमुंबईशाळांमध्ये मराठी सक्तीच्या हालचाली

शाळांमध्ये मराठी सक्तीच्या हालचाली

Subscribe

लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत घेणार निर्णय

राज्यातील इतर शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीचे करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच संकेत दिले होते. त्यानंतर याबाबत आता राज्य सरकारने हालचाली सुरु केली असल्याची माहिती हाती आली आहे. आगामी हिवाळी अधिवेशना अगोदर या निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून आगामी मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान,या निर्णयासाठी एक विशेष बैठक देखील संपन्न झाली असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होऊ घातली आहे. यासाठी अनेक निवेदने सरकार दरबारी पडून आहेत. यासंदर्भात राज्य विधी मंडळाची अनेक अधिवेशने देखील गाजली आहेत. अनेक आमदारांनी या मुद्दयांवरुन मराठी सक्तीसाठी विधीमंडळात विविध माध्यमातून प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यातील अनेक शाळांमध्ये बहुतांश राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये फक्त मराठी सक्तीची आहे. त्यानंतर सीबीएसई, आसीएसई, आयजी, आयबीच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची केली जात नाही. या शाळांमध्ये मराठी हा विषय ऐच्छिक करण्यात येतो. त्यामुळे या मुद्द्यांवरुन गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा चांगलाच गाजला होता. नुकताच नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील या मुद्द्यांवरुन विरोधकांसह सत्तेत सहभागी असलेल्या अनेक सदस्यांनी विधान परिषदेत यावरुन रणाकंदन उठविले होते. त्यानंतर पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नुकत्याच एका कार्यक्रमात मराठी सक्तीच्या मुद्यावरुन भाष्य केले होते. सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी सक्ती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता यासंदर्भात राज्य सरकारने गंभीर पाऊले उचलण्यासाठी हालचाली सुरु केली असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. यात प्राथमिक स्तरावर बैठक झालेली असल्याची माहिती देखील पुढे आली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात फक्त परिपत्रक काढून चालणार नसल्याने यासाठी राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाची मान्यता लागणार आहे. त्यामुळे आगामी मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतल्याचे समजते. या बैठकीत त्यांनी या निर्णयासंदर्भात आढावा घेतला असून त्यानुसार हा निर्णय आता लवकरच घेतला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसारच सोमवारी यासंदर्भात शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी देखील चाचपणी सुरु केल्याची माहिती आपलं महानगरच्या हाती आली आहे. तर शिक्षण विभागाची मंगळवारी बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत देखील मुख्यमंत्री या प्रश्नाबाबत आढावा बैठक घेणार आहेत.

मुख्यमंत्री आज शिक्षण विभागाचा घेणार आढावा
राज्यात नवं ठाकरे सरकार उदयास आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला असल्याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाची आढावा बैठक बोलाविली आहे. या बैठकीत शिक्षण विभागातील अनेक प्रश्नांचा आढावा घेतला जाणार आहे. ज्यात प्रामुख्याने विनाअनुदानित शाळांचा प्रश्न, वेत्तनेत्तर अनुदानाचा प्रश्न आणि शिक्षकांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह शिक्षण आयुक्त आणि शिक्षण सचिवांसह अनेक अधिकारी उपस्थित राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -