घरमुंबईहोळी सणाला गालबोट; चेंबूरमध्ये ४ वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक अत्याचार

होळी सणाला गालबोट; चेंबूरमध्ये ४ वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक अत्याचार

Subscribe

रंगपंचमीच्या दिवशी मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त असून देखील काही नराधमानी दारूच्या नशेत लहान मुली आणि महिलांना आपले लक्ष केल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहे.

रंगपंचमीच्या दिवशी मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त असून देखील काही नराधमानी दारूच्या नशेत लहान मुली आणि महिलांना आपले लक्ष केल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहे. चेंबूर, जुहू, जोगेश्वरी परिसरात या घटना घडल्या असून सर्वात संतापजनक प्रकार चेंबूर आरसीएफ या ठिकाणी घडला आहे. दारूच्या नशेत दोन नराधमांनी एका ४ वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना चेंबूरच्या आरसीएफ परिसरात घडली. या घटनेत ४ वर्षाची बालिका जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून दुसऱ्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान जुहू पोलिसांच्या हद्दीत एका ७ वर्षाच्या मुलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून जोगेश्वरी पूर्व येथे एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करण्यात आला आहे. या तिनही घटनेत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

चेंबूर आरसीएफ परिसरात राहणारी ४ वर्षाची मुलगी गुरुवारी घराजवळ होळी खेळत असताना दारूच्या नशेत तर्रर्र असणारे बिट्टू उर्फ राजू कुमार सिंह (वय 0२६) आणि साबू उर्फ रजनी कुमार सिंह (वय १९) या दोघांनी होळी खेळणाऱ्या ४ वर्षाच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून एका निर्जन ठिकाणी घेऊन आले. त्या ठिकाणी तिच्यावर दोघांनी सामूहिक अत्याचार केला. हा प्रकार एका स्थानिक नागरिकाच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड केली असता तेथील नागरिकांनी बिट्टू उर्फ राजू कुमार सिंह याला पकडले. मात्र दुसरा आरोपी साबू उर्फ रजनी कुमार सिंह हा पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बिट्टू या आरोपीला तब्यत घेऊन जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात केले. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी या दोघांविरूद्ध सामूहिक अत्याचार, तसेच बाललैंगिग अत्याचार विरोधी कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून बिट्टूला अटक करण्यात आली आहे. त्याचा दुसरा साथीदार साबू उर्फ रजनी याचा कसून शोध घेण्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, जुहू येथील एका इमारतीच्या आवारात होळी खेळण्यात दंग असलेल्या ७ वर्षाच्या मुलीवर त्याच इमारतीतील (वय ५०) राजू नावाच्या सुरक्षा रक्षकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाललैंगिग अत्याचार विरोधी कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे.

जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेच्या घरात गुरुवारी दुपारी ४५ वर्षीय इसमाने प्रवेश करून ‘चलो होली खेलेंगे’ असे बोलून या महिलेला मिठी मारली. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केली असता या इसमाने पळ काढला. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून ४५ वर्षीय बाबू उर्फ धनंजय तावडे याला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -