घरमुंबईपालिका आयुक्तांची भेट घेऊन मनसेच्या आमदाराचे काम सुरू

पालिका आयुक्तांची भेट घेऊन मनसेच्या आमदाराचे काम सुरू

Subscribe

'दीडशे मीटर परिसरात फेरीवाले बसवू नका' आमदार राजू पाटील यांची मागणी

केडीएमसी क्षेत्रातील विविध समस्यांबाबत मनसेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. रेल्वे स्थानक परिसरातील दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसवू नका तसेच मोकळया जागांवर बेकायदशीर रिक्षा उभ्या राहून देऊ नका, अशी मागणी आमदारांनी आयुक्तांकडे केली. मनसेने फेरीवाल्यांसंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावेळी त्याची प्रतही आमदारांनी आयुक्तांना दिली. त्यामुळे मनसेचे आमदार कामाला लागल्याचेच दिसून आले.

नवनिर्वाचित आमदाराच्या आयुक्तांकडे मागण्या

कल्याणातील रखडलेला पत्रिपुल, डोंबिवलीतील कोपर ब्रिज, अनधिकृत फेरीवाले, बेकायदा रिक्षा स्टँड, पाणी समस्या, २७ गावातील काही समस्या या संदर्भात आयुक्तांनी लक्ष घालून लवकरात लवकर समस्या सोडविण्याची मागणी केली. तसेच २७ गावची स्वतंत्र नगरपालिका करा आणि पुढच्यावर्षी होणाऱ्या केडीएमसी निवडणूकी सोबत स्वतंत्र २७ गावच्या स्वतंत्र पालिकेच्या निवडणूक घ्याव्यात तसेच २७ गावातील हंगामी कामगारांना परमनन्ट करण्यात यावे, अशा मागण्या आयुक्तांकडे करण्यात आली.

- Advertisement -

पत्रिपुलाचे काम लवकरच मार्गस्थ

कल्याणातील पत्रिपुलाचे काम अनेक महिन्यांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना प्रचंड वाहतूक कोडींला सामोरे जावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात बोलताना आमदार पाटील म्हणाले की, पत्रीपुलाचा विषय हा रेल्वे आणि पालिका या दोघांशी संबधित आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून चालढकलपणा सुरू असल्याने हा त्रास सहन करावा लागत आहे.  यासंदर्भात दोन्ही प्राधिकरणाची लवकरच लकवर बैठक लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विरोधीपक्ष नेते कल्याणचे माजी आमदार प्रकाश भोईर, नगरसेवक, पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


राज्यातील सत्ता घालवू नका; दिल्लीतून मुख्यमंत्र्यांवर वाढला दबाव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -