घरमुंबईबॉम्बच्या अफवेने हादरले आमदार निवास!

बॉम्बच्या अफवेने हादरले आमदार निवास!

Subscribe

मंत्रालयाशेजारी असलेल्या आकाशवाणी आमदार निवास काल, सोमवारी रात्री बॉम्बच्या अफवेने हादरले. आमदार निवासात बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचे कळताच येथील सुरक्षारक्षकांनी ताबडतोब आमदार निवास रिकामे करून पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथक तसेच श्वान पथकाने संपूर्ण आमदार निवासाची तपासणी केली. मात्र आमदार निवासात कुठलीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून न आल्यामुळे ही केवळ अफवा होती हे कळताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

- Advertisement -

नेमके काय घडले

सोमवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास मुंबईतील आकाशवाणी समोर असलेल्या आमदार निवासाला अज्ञात क्रमांकावरून बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली. यानंतर श्वानपथक, बॉम्ब स्क्वाड आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आमदार निवासात वास्तव्यास असलेल्या सर्वांना त्वरित बाहेर काढून इमारत रिकामी केली. तब्बल दोन तास सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर ही दिशाभूल करणारा कॉल असल्याची माहिती उघड झाली. दरम्यान, पोलिसांनी आमदार निवासात कॉल करून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा नंतर शोधून काढला असून त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा –

Amazon Prime Day सेलची १३ ऑक्टोबरपासून सुरुवात; ऑफर्सचा पाऊस पडणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -