कांद्यासारखीच रेमेडेसिव्हिर निर्यातीवर बंदी घाला – मनसेची मागणी

bala onion

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ज्या तत्परतेने बंदी घातली, तशीच तत्परता ही रेमेडेसिव्हिर इंजेक्शनच्या बाबतीत घालायला हवी. राज्यभर शेकडो नागरिकांना “रेमडेसिव्हिर” साठी पूर्ण दिवस रांगेत थांबून ही अनेकदा मिळत नाही व अनेक ठिकाणी त्याचा काळाबाजार चालला आहे तर दुसरीकडे अनेक देशांना आपण त्याचा पुरवठा करीत आहोत. विदेश नीतीचा भाग म्हणून हे करणे मान्य असले तरी पहिले आपल्या नागरिकांना ते उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिकता असायला हवी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

रेमेडेसिव्हिर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा आहे. सध्या या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत आहे. हे इंजेक्शन खरेदीसाठी राज्याबाहेरून माणस पुण्यात येत आहेत. लोकांचे सर्वत्र अक्षरशः हाल सुरू आहेत. लोकांना या इंजेक्शन उपलब्ध व्हावे म्हणून संपुर्ण दिवस रांगेत उभे रहावे लागत आहे. लोकांचे चाललेले हे हाल पाहूनच केंद्र सरकारने प्राधान्याने या इंजेक्शनच्या परदेशातील निर्यातीवर बंदी घालावी अशी मागणी मनसेने केली आहे. विदेशी नीतीचा भाग म्हणून निर्यातीवर बंदी घालावी असे मनसेचे म्हणणे आहे. हीच केंद्र सरकारची प्राथमिकता असायला हवी अशी मागणी मनसेने केली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबतचे एक ट्विट व्हायरल केले आहे. काय म्हटलय त्यांनी ट्विटमध्ये ?