घरताज्या घडामोडीधक्कादायक: पंजाबने कोरोनाच्या मृत्यूदरात जगाला टाकलं मागे

धक्कादायक: पंजाबने कोरोनाच्या मृत्यूदरात जगाला टाकलं मागे

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत देश दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान पंजाबमधील कोरोनाचा मृत्यूदर हा जगात सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. पंजाबमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण सुरुवातीपासून कमी असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील ठीक आहे. पण पंजाबमधील मृत्यूदर काही कमी होताना दिसत नाही आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी देशात पहिल्यांदा पंजाबमध्ये कर्फ्यू लावला. पण तरीदेखील पंजाबने कोरोनाच्या मृत्यूदरात जगाला मागे टाकले आहे. जगातील कोरोनाच्या मृत्यूदर २.९४ टक्के आहे, तर पंजाबमधला ३.६ टक्के आहे.

वास्तविक पंजाबमध्ये दोन दिवसांत ४० पेक्षा कमी मृत्यूची नोंद होते. पंजाबमध्ये गेल्या २४ तासांत ३२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ८४६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी ३७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तर १ हजार ३० कोरोनाबाधित आढळले होते. दरम्यान सोमवारी पंजाबमध्ये १२ हजार ६२३ Active रुग्ण होते, यामध्ये मागील २४ तासांत घट होऊन ११ हजार ७३० झाले आहेत. पण पंजाबमधला मृत्यूदराचा आकडा कमी होताना दिसत नाही आहे. पंजाबमधील मृत्यूदर २.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर जगातील कोरोनाचा मृत्यूदर २.९४ टक्क्यांच्या जवळपास आहे. देशातील मृत्यूदर १.५५ टक्के आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९५ टक्के आहे.

- Advertisement -

पंजाबमधील वाढत्या मृत्यूदराच्या पार्श्वभूमीवर मुख्ममंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहेत. तसेच या मृत्यूदराचे वाढत्या प्रमाणाचे कारण शोधण्यासाठी एक टीम तयार केली आहे. तसेच वाढत्या मृत्यूदरासंदर्भातील पंजाब सरकारचे सल्लागार डॉ. केके तळवाड म्हणतात की, ‘मृत्युदर निश्चितच आपल्यासाठी चिंतेचे कारण आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी थोडा वेळ लागेल. खाली येण्यास थोडा वेळ लागेल.’


हेही वाचा – Gold Price Update: खरेदीला लागा; सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -