घरमुंबईमोदींच्या राजकीय इच्छाशक्तीमुळेच भ्रष्टाचार उघड! - किरीट सोमय्या

मोदींच्या राजकीय इच्छाशक्तीमुळेच भ्रष्टाचार उघड! – किरीट सोमय्या

Subscribe

माय महानगरच्या फेसबूक लाईव्ह मुलाखतीत संवाद साधताना सोमय्या यांनी घोटाळे, ईडी कारवाई आणि राजकीय परिस्थिती असा चौफेर प्रवासावर आपले मनोगत व्यक्त केले.

२०१४ पासून राजकीय भ्रष्टाचार उघडे पडण्यास सुरुवात झाली. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आरूढ झाल्यानंतर त्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यामुळेच इतके भ्रष्टाचार बाहेर येऊ शकले. भ्रष्टाचाराच्या विरोधात मोदींनी कडक पावले उचलल्यामुळे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना हे सारे सूडबुद्धी वगैरे वाटणारच. आता यात भाजपचे नेते का फसले नाहीत?, असाही प्रश्न विचारला जात आहे. मात्र १९९९ पासून राज्यात भाजपची सत्ता नव्हती. शिवाय केंद्रात २००४ पासून आमची सत्ता नव्हती. मुख्य म्हणजे तपास यंत्रणा पक्ष बघून कारवाई करत नाही’, अशा शब्दांत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी “घोटाळे आणि ईडीचा फेरा’’, या विषयावरील मुलाखतीत आपल्या नेहमीच्या शैलीत रोखठोक मत व्यक्त केली.

माय महानगरच्या फेसबूक लाईव्ह मुलाखतीत संवाद साधताना सोमय्या यांनी घोटाळे, ईडी कारवाई आणि राजकीय परिस्थिती असा चौफेर प्रवासावर आपले मनोगत व्यक्त केले. १९४७ पासून २००७ पर्यंत भारतीय बँकानी १७ लाख कोटींचे कर्जवाटप केले होते. त्यानंतर २००७ पासून २०१४ पर्यंत ५२ लाख कोटींचे कर्ज वाटण्यात आले. स्वातंत्र्यानंतर जितके कर्ज वाटप झाले नव्हते ते या पाच वर्षात कसे काय झाले? धडाधड कर्जवाटप केल्यामुळे या काळातच मोठे घोटाळे झाले.

- Advertisement -

चिदंबरम यांचा मुलगा कार्ति चिदंबरम याने जवळपास २१ देशांमध्ये केलेले वाणिज्य व्यवहार समोर येत आहेत. एक-दोन डझन बोगस कंपन्या देखील उघडकीस आल्या आहेत. त्याची नावे जरी ऐकली तरी हसायला येईल. या बोगस कंपन्यांच्या मार्फत बोगस व्यवहार करण्यात आले आहेत. या कंपन्यांनी एकमेकांना फायदा पोहोचवलेला आहे. मला मिळालेली माहिती मी ईडी आणि सीबीआयकडे सुपुर्द केली. सुब्रमण्यम स्वामी यांनी यात जास्त अभ्यास केलेला आहे. चिदंबरम प्रकरणात आता अधिक तपास सुरु आहे.

#Live : ईडीचा फेरा आणि युतीचा घेरा… माजी खासदार किरीट सोमय्या यांचे 'खुल्लमखुल्ला'थेट भाष्य.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 25, 2019

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -