घरCORONA UPDATELockDown: मेट्रोमोनियल साईट्स सुसाट! सर्वाधिक तरुण-तरुणी शोधतायंत जोडीदार

LockDown: मेट्रोमोनियल साईट्स सुसाट! सर्वाधिक तरुण-तरुणी शोधतायंत जोडीदार

Subscribe

अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक तरुणांच्या लग्न सोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले. अनेकांचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. तसेच ऑफिस किंवा कॉलेजला जाणारा तरुण वर्ग आता या लॉकडाऊनमुळे घरीच असल्यामुळे तरुण-तरुणी भविष्यात आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा याकरता मेट्रोमोनियल साईट्सकडे वळला आहे. या लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी विविध मेट्रोमोनियल साईटच्या माध्यमातून आपल्या योग्य जोडीदाराचा शोध मोहिमेत वेळ घालवत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या सुविधेसाठी मेट्रोमोनियल कंपन्यांनीकडूनही अनेक ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनामुळे देशातील मेट्रोमोनियल साईटवाल्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत, असे म्हणावे लागेल.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरातील लॉकडाऊन १७ मेंपर्यत वाढवण्याच्या आला आहे. त्यामुळे या लॉकडाऊन काळात तरूण वर्ग घरीच असल्यामुळे आपल्या मनोरंजनासाठी आणि वेळ घालवण्यासाठी युट्यूब, फेसबुक, टिकटॉकवरील व्हिडिओ किंवा वेबसीरिज बघत आहेत. तसेच आता अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रोम होम’ असल्याने आपल्या कुटुंबियांना वेळ देता येत आहे. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना शाळेत घालण्यापासून ते अगदी त्यांच्या लग्नासाठी योग्य जोडीदार मिळेपर्यंत धडपडत असतात. मात्र या लॉकडाऊन काळात कुटुंबियांनीसुद्धा आपल्या मुला-मुलीला उत्तम जोडीदार मिळावा याकरता मेट्रोमोनियल संकेत स्थळांवर नोंदणी सुरु केली आहे.

- Advertisement -

आता लग्न जुळवण्याच्या पारंपरिक पद्धती लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन जोडीदार शोधण्यावर नागरिकांचा भर वाढला आहे. विवाह शास्त्र या मेट्रोमोनियल साईटच्या सीईओ दीपिका दुबे यांनी दैनिक महानगरशी बोलताना सांगितले की, लॉकडाऊन पूर्वी मेट्रोमोनियल साईटवर भेट देणाऱ्यांची संख्या खुप कमी होती. मात्र या लॉकडाऊन काळात या साईटवर भेट देणाऱ्याची संख्या ५० टक्क्यांनी वाढली आहे. यापूर्वी अनेक सदस्यांच्या नोंदणीत अनेक त्रुटी असायचा, त्यामुळे त्यांची प्रोफाईल अ‍ॅक्टीव्ह नसायची. मात्र या लॉकडाऊन काळात नोंदणी प्रक्रियेत सर्व कागद पत्रासहीत तरुण-तरुणी नोंदणी करत आहेत. मोठ्या प्रमाणात मेट्रोमोनियल साईटवर अ‍ॅक्टीव्हसुद्धा आहेत.

मेट्रोमोनियल साईट नोंदणी करताना काही जुजबी माहिती टाकावी लागते. लॉकडाऊन पूर्वी तरुण तरुणी अर्धवट माहिती टाकत होते. सतत ‘अ‍ॅक्टीव्ह नसायचे, मात्र आता लॉकडाऊनमुळे नाव, फोटो, मोबाइल, ई-मेल, पत्ता, वय, शिक्षण, जात – धर्म आणि कसा जोडीदार हवा, या सर्व गोष्टी प्रोफाईलमध्ये टाकत आहेत. तसेच अकाऊंट अ‍ॅक्टीव्ह दिसून येत आहे.
– दीपिका दुबे, विवाह शास्त्र, सीईओ

- Advertisement -

लॉकडाऊन काळात ऑफर्स

मराठी तरुण-तरुणींसाठी एबीपी वेडिंग मेट्रोमोनियल साईट खुप प्रसिद्ध आहे. याचे साईट आणि अॅपसुद्धा उपलब्ध आहेत. ज्यावर मराठी तरुण-तरुणीच्या अडीच लाखापेक्षा जास्त सदस्य आहेत. लग्न जुळवण्यासाठी इच्छुक असलेली मुले-मुली किंवा त्यांचे नातेवाइक अगदी मित्रमैत्रिणीसुद्धा त्यांच्या नावे मॅट्रिमोनिअल साइटवर नोंदणी करू शकतात. नोंदणी करणाऱ्या सदस्यांना चांगल्या आणि योग्य (त्यांच्या दृष्टीने) स्थळांची माहिती दरमहा ठराविक रक्कम आकारून दिली जाते. मात्र सध्या लॉकडाऊन असल्यामुळे ४ हजार रुपयांचे पॅकेज ९९९ रुपयेला उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर विवाह शास्त्र या मेट्रोमोनियल साईट एक महिन्याची मोफत सेवा देत आहेत.

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हा महत्वाचा टप्पा असतो. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे तरुण-तरुणींना आपला जोडीदार निवडण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे मेट्रोमोनियल साईडवर भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एबीपी वेडिंगकडूनसुद्धा कमी कालावधीत योग्य जोडीदार शोधून द्यायचा आहे. या लॉकडाऊन काळातसुद्धा एबीपी वेडिंगचे सर्व कर्मचारी काम करत आहेत.
– सतीश शिरलोडे, सिनियर मॅनेजर, एबीपी वेडिंग

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -