घरमुंबईमुंबई अध्यक्षांचा निर्णय गुरुवारी

मुंबई अध्यक्षांचा निर्णय गुरुवारी

Subscribe

भाई जगताप, कृपाशंकर सिंह, निरुपम चर्चेत

लोकसभा निवडणुकीत पराभव जिव्हारी लागल्यानंतर काँग्रेसमध्ये सुरु झालेल्या राजीनाम्या सत्रात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी देखील राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून यासाठी गुरुवारी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दिल्लीत वरिष्ठ नेते गुरुवारी मुंबईत येणार असून यावेळी होणार्‍या बैठकीत याबाबत अंतिम नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान अध्यक्षपदासाठी आमदार भाई जगताप, माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह कृपाशंकर सिंह यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीत मुंबईसह देशात काँग्रेसला दारुण पराभव स्विकारावा लागल्याने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला होता. त्यात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी देखील राजीनामा दिला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील ही दोन्ही पदे रिक्त होती. त्यातच राज्यात येत्या काळात लवकरच विधानसभा निवडणूक होणार असल्याने या पदांसाठी कोणाची वर्णी लागते हे पाहणे उत्सकुतेचे ठरले होते. ही बाब लक्षात घेता काँग्रेस हायकमांडने काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली. मात्र मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादाने डोके वर काढल्याने याचा फटका निवडणुकीला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसला वाली कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सध्या अनेक नावांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यात प्रामुख्याने आमदार भाई जगताप यांचे नाव आघाडीवर असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे. तर मिलिंद देवरा यांच्यापूर्वी मुंबई अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे संजय निरुपम हे देखील पुन्हा इच्छुक असल्याची जोरदार चर्चा काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आली आहे. तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक कृपाशंकर सिंह यांचे देखील नाव चर्चेत असल्याची माहिती पुढे आली आहे. काही दिवसांपूर्वी कृपाशंकर सिंह हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी काँग्रेसकडून त्यांच्या ही नावाची चाचपणी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या नावांच्या अंतिम निश्चितीसाठी मुंबईत दिल्लीत पक्षश्रेष्ठी विशेष बैठक घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. ज्यात महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरर्गे यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने आपलं महानगरशी बोलताना दिली.

प्रदेशाध्यक्ष दिल्लीत
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झालेले आमदार बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी दिल्ली गाठली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या बैठकीत त्यांनी मुंबई प्रदेशाध्यक्षा बाबतही चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -