घरताज्या घडामोडीलॉकडाऊनमध्ये आर्थिक तंगी म्हणून तो 'Male Escort' बनला आणि १५ लाखांचा चुना...

लॉकडाऊनमध्ये आर्थिक तंगी म्हणून तो ‘Male Escort’ बनला आणि १५ लाखांचा चुना लागला

Subscribe

लॉकडाऊनमध्ये एका व्यक्तीला आर्थिक तंगी म्हणून मेल एस्कॉर्ट ‘Male Escort’ होण्याचा विचार करणे महागात पडले आहे. यामुळे त्याला १५ लाखांचा चुना लागल्याचे समोर आले. पीडित व्यक्तीला महिलांसाठी एस्कॉर्ट सर्व्हिसमध्ये सामील होऊन चांगले पैसे मिळवण्याचे आमिष दाखवले गेले होते. ही घटना मुंबईत घडली आहे.

पीडित व्यक्तीला दररोज एका महिलेसोबत डेटला जायची संधी मिळेल आणि त्याचवेळी पैसे मिळतील असे फसवणाऱ्या महिलेने सांगितले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीला या सर्व्हिसमध्ये रुजू होण्यासाठी एस्कॉर्ट सर्व्हिसचे लायसन्स मिळवण्यासाठी पैसे भरण्यास सांगितले.

- Advertisement -

नक्की काय घडले?

जून महिन्यापासून पीडित व्यक्तीच्या कामाला मेल एस्कॉर्ट म्हणून सुरुवात झाली. सुरुवातीला त्याला सोनाली नावाच्या महिलेचा फोन आला. तिने त्याचे वय आणि पार्श्वभूमी जाणून घेतली आणि फोटो पाठवण्यास सांगितला. मग तिने त्याला डेटिंग सर्व्हिसमध्ये नोकरी देण्याची ऑफर दिली. त्यावेळेस पीडित व्यक्तीला ई-वॉलेटद्वारे रजिस्ट्रेशन फी २६ हजार ५०० रुपये देण्यात सांगितले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. पीडित व्यक्तीला दरमहा २० ते २५ हजार रुपये मिळतील असे आश्वासन दिले होते.

त्यानंतर सोनालीने पीडित व्यक्तीला चार महिलांचे फोटो, संपर्क तपशील पाठवला आणि त्यातील एक महिलेला निवडण्यास सांगितले. त्यानंतर पीडित व्यक्तीने एका राधिका नावाच्या महिलेला निवडले. जेव्हा राधिकाला फोनो केला तेव्हा तिने त्याच्याकडे एस्कॉर्ट सर्व्हिस लायन्सस आहे का?, असे विचारले. त्याने याला नाही असे उत्तर दिले. मग तिने १.१४ लाख रुपये देऊन लायन्सस मिळेल असे सांगितले. दरम्यान एका आठवड्यातच बनावटखोरीमुळे त्या व्यक्तीला ७ लाखांचा तोटा झाला.

- Advertisement -

जेव्हा हे सगळे पैसे पीडित व्यक्तीने परत मागितले तेव्हा त्याला पुन्हा पैसे मिळवण्यासाठी ४.७ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. एकूण पीडित व्यक्तीने १५ लाख रुपये दिले. एके दिवशी पीडित व्यक्तीचा विश्वास जिंकण्यासाठी त्याच्या खात्यात १० हजार रुपये जमा केले होते, असे त्याने तक्रारीत सांगितले आहे. त्यामुळे सध्या याप्रकरणी विलेपार्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिस या आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -