घरमुंबईम्हैसकरांच्या कुटुंबात जुळ्या मुलींचा जन्म

म्हैसकरांच्या कुटुंबात जुळ्या मुलींचा जन्म

Subscribe

मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या कुटुंबात जुळ्या मुलींचा जन्म झाला आहे. एकुलता एक मुलगा मन्मथच्या आत्महत्येनंतर आता आयव्हीएफद्वारे जुळ्या मुलींचा जन्म झाला आहे.

आपला एकुलता एक मुलगा मन्मथच्या आत्महत्येनंतर खचलेल्या मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंद निर्माण झाला आहे. मन्मथच्या आत्महत्येनंतर वर्षभरातच मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या कुटुंबात जुळ्या मुलींचा जन्म झाला आहे. राज्यातील वरीष्ठ सरकारी अधिकारी असलेल्या या दाम्पत्यानं आयव्हीएफच्या मदतीनं जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. ‘हा खरंच चमत्कार आहे,’ अशा शब्दांत मनीषा म्हैसकर यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये या दोन्ही मुलींचा जन्म झाला असून या शुक्रवारी त्यांना त्यांच्या घरी नेण्यात येईल असं इंग्रजी वृत्तपत्र ‘टाईम्स ऑफ इंडिया’ मध्ये सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आयव्हीएफ विशेतज्ज्ञ डॉ. जतीन शाह यांनी ही सरोगसी केल्याची माहिती समोर आली असून म्हैसकर कुटुंबाकडून याबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

सर्वांच्या सदिच्छांमुळं झालं शक्य – मनीषा म्हैसकर

‘या मुलींचा जन्म म्हणजे देवाची कृपाच असून आमच्या आयुष्यातील नवी पहाट आहे. आमच्या कठीण काळातही जे आमच्याबरोबर राहिले, त्यांच्या प्रार्थना आणि त्या सर्वांच्या सदिच्छांमुळे आणि आधुनिक विज्ञानामुळेच हे शक्य झालं आहे,’ अशी भावना मनीषा म्हैसकर यांनी व्यक्त केली आहे. मनीषा म्हैसकर सध्या शहर विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून कार्यरत असून त्यांचं वय ४९ वर्ष आहे, तर मिलिंद म्हैसकर हे ५० वर्षांचे असून म्हाडाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा मन्मथ यानं गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये त्यांच्याच इमारतीवर चढून आत्महत्या केली होती. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये पुन्हा एकदा सरोगसीच्या माध्यमातून आई – बाबा होण्याचा निर्णय म्हैसकर दाम्पत्यानं घेतला. या निर्णयाबाबत केवळ त्यांच्या निकटवर्तीयांनाच माहीत होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -