घरमुंबईअवनीच्या हत्येविरोधात आंदोलन; निरुपम यांना आंदोलनकर्त्यांनी हकलवले

अवनीच्या हत्येविरोधात आंदोलन; निरुपम यांना आंदोलनकर्त्यांनी हकलवले

Subscribe

अवनीच्या बछड्यांना रेस्क्यू करुन त्यांना मोठे करुन प्राणी संग्रहालयात न ठेवता त्यांना जंगलात सोडले पाहिजे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा. तसंच अवनीची हत्या करणाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

अवनी वाघिणीच्या हत्येच्याविरोधा आज दादरच्या शिवाजीपार्कमध्ये वनप्रेमींनी आंदोलन केले. रविवारी सायंकाळी ४ वाजता हे आंदोलन करण्यात आले. वरळी सी लिंक ते शिवाजीपार्क पर्यंत मोर्चा रॅली काढण्यात आली होती. अनेक एनजीओ आणि प्राणीप्रेमी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते त्यांनी अवनीच्या हत्येचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी काँग्रेसेचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आले असता. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान संजय निरुपम यांनी तिथून काढता पाय घेतला.

अवनीच्या हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी आंदोलनकांनी केली आहे. त्याचसोबत अवनीच्या दोन बछड्यांना शोधून काढले पाहिजे. अवनीच्या बछड्यांना रेस्क्यू करुन त्यांना मोठे करुन प्राणी संग्रहालयात न ठेवता त्यांना जंगलात सोडले पाहिजे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा. तसंच अवनीची हत्या करणाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून अवनीच्या हत्येचा निषेध व्यक्त केला आहे.

- Advertisement -

Mumbaikars stage protest against Avni's death, demand for justice.

अवनीच्या हत्येविरोधात आंदोलन; निरुपम यांना आंदोलनकर्त्यांनी हकलवले | #MyMahanagar

Posted by My Mahanagar on Sunday, 11 November 2018

 

संबंधित बातम्या – 

अवनीच्या शिकारीचं पापही माथी घ्या – उद्धव ठाकरे

अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन

अवनी शिकार प्रकरण: गडकरींनी केली मुनगंटीवारांची पाठराखण

अवनीबाबत पोस्टमॉर्टममधून धक्कादायक माहिती समोर

अवनीचे बछडेही नरभक्षकच होणार – शूटर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -