घरमुंबईझिग झॅग रोडवरील संरक्षक भिंतीला तडे, सोसायटीला महापालिकेची नोटीस

झिग झॅग रोडवरील संरक्षक भिंतीला तडे, सोसायटीला महापालिकेची नोटीस

Subscribe

तीन वर्षांपूर्वी पाली हिलमधील ज्या झिग झॅग रोडवरील रस्ता खचण्याची घटना घडली होती. त्याच ठिकाणी असलेल्या सोसायटीची भिंत आता धोकादायक बनली असून ही भिंत कोणत्याही क्षणी कोसळून दुघर्टना घडण्याची शक्यता आहे. ही संरक्षक भिंत खासगी इमारतीची असल्याने त्या सोसायटीला महापालिकेच्यावतीने नोटीस बजावण्यात आली आहे.

खार पश्चिम येथील झिग झॅग रोड हा भाग टेकडीचा परिसर आहे. सन २०१७ मध्ये येथील झाड मुळासकट उन्मळून पडल्यामुळे येथील रस्ता खचला होता. त्यामुळे येथील रस्ता वाहतुकीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आला होता. परंतु या घटनेनंतर मागील जुलै महिन्यात भाजपच्या स्थानिक नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी तत्कालिन एच-पश्चिम विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र देवून याच ठिकाणी असलेली झाडं कोणत्याही क्षण उन्मळून पडून रस्ता खचण्याची भीती वर्तवली होती. स्थानिक रहिवाशांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होवू नये म्हणून म्हात्रे यांनी ही मागणी केली होती. परंतु आता याच झाडांजवळील टेकडीवरील सोसायटीच्या भिंतीलाच तडे गेले आहेत. त्यामुळे मुसळधार पावसात वादळ वाऱ्यामुळे ही भिंत केव्हाही कोसळून रस्त्यावरील पादचारी आणि वाहनांना धोका पोहोचू शकतो, अशी भीती स्वप्ना म्हात्रे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

ही झाडे खासगी सोसायटीकडून कापून घेत त्यांच्याकडून भिंतीची डागडुजी करून घ्यावी, अशी मागणी स्वप्ना म्हात्रे यांनी केली आहे. जर ते करत नसतील तर त्यांना नोटीस देत महापालिकेने ही झाडे कापून झाडांची डागडुजी करावी, अशीही सूचना केली. याबाबत एच-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येथील दोन्ही झाडे कापण्याची कार्यवाही सुरु केली असून धोकादायक भिंतीबाबत सोसायटीला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच भिंतीच्या शेजारील रस्त्यांचा भाग बॅरेकेट्स लावून संरक्षित करण्यात आला असल्याचे सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -