माझेही मत …

Mumbai
Election

उमेदवारांची तुलना करणे गरजेचे

निवडणुकीत उतरणार्‍या प्रत्येक पक्षाने जनतेसमोर आपले देशाप्रतीचे व्हिजन प्रामाणिकपणे मांडले पाहिजे.निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराने केवळ आपल्या ठराविक मतदारांचा विचार न करता सर्व देश व्यापक भुमिका निवडणुकीत घेणे गरजेचे आहे. मुळात मतदारांना खासदाराची कामे कोणती आणि आपल्या मतदारसंघातील उमेदवारांची तुलना केली असता योग्य उमेदवार कोणता याची पारख असणे गरजेचे असते,तरच संसदेत आपण आपल्या मतदार संघातून सक्षम लोकप्रतिनिधी पाठवू शकतो.निवडूण येणारे प्रत्येक सरकार हे जनतेच्या प्रश्नांशी प्रामाणिक असावे.याआधी निवडून येण्यासाठी सरकारने जेवढी वचने दिली आहेत,ती सर्व पूर्ण झाली का हे मतदाराने देखील आता विचारणे गरजेचे आहे.तरच त्या मताचा योग्य तो मान-सन्मान राखला जाईल. – पुजा कदम, आयटी प्रोफेशनल

विचारपूर्वक मतदानाचा हक्क बजावा

लोकसभा निवडणुकीत जेव्हा आपण देशाचे नागरिक म्हणून मतदान करत असतो तेव्हा आपण संपूर्ण देशाचे भवितव्य ठरवीत असतो. त्यामुळे विचारपूर्वक मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे आहे. माझ्या मते, लोकसभा निवडणुकीत लहान अनुभवशून्य पक्षांच्या उमेदवारांपेक्षा, प्रशासकीय अनुभव असणार्‍या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे आहे. मतदाराचे मत हे त्याच्या मताचेच प्रतिबिंब असते. परिणामी मतदानाच्या बाबतीत कोणाच्याही प्रभावाखाली मतदान करणार नाही याची मतदाराने काळजी घ्यावी. प्रत्येकाचा दृष्टिकोन, प्राधान्य भिन्न असणे स्वाभाविक आहे. पण तरीही तुमचे मत हे उत्कृष्ट भारतासाठी महत्वाचे ठरेल, हे न बदलणारे सत्य आहे. आज आपल्या देशाला आपली सर्वाधिक गरज आहे. नागरिक म्हणून सामाजिक जबाबदारीपेक्षाही भारतीय म्हणून मतदान करणे हे आपणा सर्वांचे मूलभूत कर्तव्य आहे. -डॉ. भूषण जाधव, राजकीय विश्लेषक

मत काळजीपूर्वकच द्यावे

दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक ही देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाची असते.निवडणुकीचा एक दिवसच नव्हे तर तुमच्या आयुष्यातील तब्बल पाच वर्षे लोकप्रतिनिधीच्या हातात सोपवत असतात.त्यामुळे मतदान काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.याधीच्या सरकारने दिलेली वचने पूर्ण केली आहेत की नाही, हे मतदाराने तपासले पाहिजे.तरच देश उत्तम घडवण्यात आपण मतदार म्हणून योग्य भूमिका बजावू शकतो.एक मतदार म्हणून आपण फक्त आपलेच नाही तर आपल्या लहान मुलांचे तसेच भावी पिढीचे भविष्य ठरवत असतो.येणारे सरकार देशाच्या प्रगतीकडे लक्ष याबद्दल ेक नागरिक म्हणून सरकारवर आपला अंकुश हवा आणि ते मतदानानेच शक्य असते. त्यामुळे मत हे काळजीपूर्वक देणेच गरजेचे आहे.तरच राज्यकर्ते आपल्याला गृहीत धरणार नाहीत. – काजल गुरव, कॉलेज विद्यार्थिनी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here