करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईत अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स!

करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तसेच संसर्ग वाढल्यास त्याकरिता आवश्यक नियोजन करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दूरगामी विचार करीत महापालिकेच्या विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांकडे प्रमुख जबाबदाऱ्या सोपवित महापालिका अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स निर्माण केला आहे.

Navi Mumbai
Navi Mumbai Munciple Corporation
नवी मुंबई महापालिका मुख्यालय

करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तसेच संसर्ग वाढल्यास त्याकरिता आवश्यक नियोजन करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दूरगामी विचार करीत महापालिकेच्या विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांकडे प्रमुख जबाबदाऱ्या सोपवित महापालिका अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स निर्माण केला आहे. तशाप्रकारचा आदेश जारी करण्यात आला असून यामध्ये महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालये तसेच सेवाभावी संस्था यांच्या समन्वय साधून आयसोलेशन वॉर्ड तसेच क्वॉरंटाईन इन्स्टिट्युशन तयार करण्यासाठी नियोजन करण्याचे काम अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे.

सेवाभावी संस्थांकडून क्वॉरंटाईन व्यक्ती आणि अत्यावश्यक सेवेत कार्यरत व्यक्ती यांच्या करिता अन्नपदार्थ उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासंदर्भात केंद्र शासन, राज्य शासन, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने समन्वय राखणे, त्यांना विविध माहिती उपलब्ध करुन देणे तसेच या संदर्भातील बैठकांना उपस्थित राहणे, महापालिकेच्या विविध विभागात याबाबत समन्वय राखणे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरते रूग्णालय तयार करण्याच्या दृष्टीने पूर्वनियोजन करण्यासाठी मिलेटरी, पॅरा मिलेटरी संस्थांशी समन्वय साधणे आदी कामांची जबाबदारी उपआयुक्त अमोल यादव यांचेकडे सोपविण्यात आलेली आहे.

करोना विषांणूचा प्रसार रोखण्याकरिता महापालिका क्षेत्रातील संपूर्ण वैद्यकिय परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे. तसेच वेळोवेळी अहवाल सादर करणे याबाबतची जबाबादारी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे यांच्याकडे असणार आहे.

महापालिकेच्या सर्व कार्यालयांच्या बाहेर, रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयांच्या बाहेर हात धुण्यासाठी वॉश बेसीन बसविणे आणि त्या ठिकाणी हॅन्डवॉश सुविधा उपलब्ध करून देणे. तसेच महापालिका क्षेत्रात नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेणे. शहरामध्ये पदपथ दिवे, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुस्थितीत चालू राहतील याची काळजी घेणे. तसेच मलनि:स्सारण यंत्रणा काटेकोरपणे काम करेल याची दक्षता घेणे याबाबतची जबाबदारी शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांची असणार आहे.

  • करोना विषांणूचा प्रसार रोखण्यासंदर्भात केंद्र शासन, राज्य शासन, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नवी मुंबई महापालिकेमार्फत निर्गमित होणाऱ्या आदेशांची अंमलबजावणी करणे, क्वॉरंटाईन सेंटरचे होम क्वॉरंटाईन असलेले नागरिक आदेशाची अंमलबजावणी करीत नसल्यास पोलीस विभागाशी समन्वय साधून पुढील उचित कारवाई करणे. त्याचप्रमाणे कोव्हीड – 19 चे प्रिव्हेशन आणि कन्टेटमेन्ट मेजर्सचे आदेश वेळोवेळी निर्गमित करणे तसेच कोव्हीड – 19 करीता अत्याधूनिक सॉफ्टवेअर तयार करणे आदी कामांची जबाबदारी उप आयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांचेकडे सोपविण्यात आलेली आहे.
  • नवी मुंबई महापालिका क्षेत्रात क्वॉरंटाईन सेंटरकरीता, आयसोलेशन वॉर्डकरीता आवश्यक त्या बेड्सच्या संख्येप्रमाणे जागा निश्चित करुन तेथे आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन घेणेबाबतचे काम उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी पहावयाचे आहे.
  • आपती व्यवस्थापन विभागाकडील डॅश बोर्ड मॉनिटर करण्यासाठी प्रत्येक शिफ्टमध्ये दोन या प्रमाणे प्रतिदिन सहा कर्मचारी उपलब्ध करून देणे. तसेच आपती व्यवस्थापन विभागाकरीता आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध करून देणे विषयक कामकाजाची जबाबदारी उपआयुक्त किरणराज यादव यांची असणार आहे.
  • क्वारंटाईन सेंटर येथे दाखल होणाऱ्या रुग्णांकरीता पिण्याचे शुध्द पाणी, चहा, अल्पोपहार व भोजन व्यवस्था करणे, तसेच दाखल होणाऱ्या रूग्णांना साबण, हॅन्डवॉश, टॉवेल, सॅनिटायझर इ. आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे. त्याचप्रमाणे कृषि उत्पन्न बाजार समिती (APMC) शी समन्वय साधून शहरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी पडणार नाही याची दक्षता घेणे (उदा. दूध, फळे, भाजीपाला, अन्नधान्य इ.) याबाबतची जबाबदारी उपआयुक्त नितीन काळे यांचेकडे सुपर्द करण्यात आलेली आहे.

    हेही  वाचा – CoronaVirus: अहमदनगरमध्ये आढळला तिसरा ‘करोना’ पॉझिटिव्ह


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here