घरमुंबईठाण्यात शिवसेना झुगारतेय पक्षप्रमुखांची भूमिका - राष्ट्रवादी

ठाण्यात शिवसेना झुगारतेय पक्षप्रमुखांची भूमिका – राष्ट्रवादी

Subscribe

ठाण्याची शिवसेना आपल्या पक्षप्रमुखांचे म्हणणे झुगारत असल्याचेच दिसून येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहारध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, त्यांचे ठाण्यातील शिलेदार याच बुलेट ट्रेनसाठी दिवा पंचक्रोशीतील नागरी सुविधांसाठी आरक्षित असलेल्या भुखंडांवरील आरक्षण उठवण्याचा ठराव मांडत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ठाण्याची शिवसेना आपल्या पक्षप्रमुखांचे म्हणणे झुगारत असल्याचेच दिसून येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहारध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. बुधवारी होणार्या महासभेमध्ये ठाणे शहराच्या हिताचे नसलेले काही प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेकडून आणले जाणार आहेत. या प्रस्तावांना राष्ट्रवादीचे नगरसेवक विरोध करणार आहेत, याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. यावेळी आनंद परांजपे यांनी, ठाणे महानगर पालिकेतील सत्ताधार्यांदचे चाणक्य अंगलट आलेली चर्चाच होऊ द्यायची नाही, यासाठी सतत तत्पर असतात. ते अचानक राष्ट्रगीत सुरु करुन महासभा संपवून टाकतात. ठाण्याच्या समस्यांवर चर्चा करण्यापेक्षा समस्या बघून पळ काढण्याचे धोरण सत्ताधारी शिवसेनेचे आहे, असंही ते यावेळी म्हणले.


वाचा : मेट्रोच्या भूमिपूजनासाठी येणाऱ्यांना दुष्काळग्रस्तांसाठी मुहूर्त नाही?

ठाणेकरांच्या सोयीसाठी…

ठाणे जिह्यातील विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्याचा त्रास वाचावा आणि ठाणेकर विद्यार्थ्यांना विद्यापीठ उपकेंद्रात नवनवीन शिक्षण पद्धतींचा अभ्यास करता यावा, यासाठी चांगल्या सुविधा उपकेंद्रात मिळाव्यात या हेतूने विद्यापीठ उपकेंद्रासाठी 20 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. या निधीला ठाणे महापौरांनी विरोध केला होता. आता एका प्रतापी आमदाराच्या आग्रहास्तव संरक्षित अशा उपवन तलावात तरंगता रंगमंच बांधण्यासाठी २२ कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या अगोदरही ठाण्यात बॉलीवूड पार्क, थीम पार्क, सुगंधी झाडे इत्यादी कल्पक तसेच आकर्षक प्रकल्पांच्या नावाखाली भ्रष्टाचार झालेला आहेच; तरीही, २ कोटींची खैरात करण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे. एकूण ५.९५ एकरमध्ये विस्तारलेले उपवन तलाव हे संरक्षित पाणथळ प्रकारात मोडतं. त्यामुळे उच्च न्यायालयाने तलावामध्ये बांधकाम करण्यास मनाई केली आहे. तरीही, प्रतापी आमदारांसाठी २२ कोटींचा निधी देऊन भ्रष्टाचाराचे कुरण तयार केले जात असून, त्यास राष्ट्रवादीचे नगरसेवक विरोध करणार आहेत. त्यामुळे प्रशासनानेही सत्ताधार्यां च्या या भ्रष्टाचाराला साह्य करु नये, असे आनंद परांजपे यांनी सांगितले.

- Advertisement -

पालिकेच्या भूखंडांवरील आरक्षण हटवण्याच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी बुलेट ट्रेनला विरोध केला आहे. त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करीत आहोत. मात्र, त्यांच्याच पक्षाचे ठाण्यातील लोकप्रतिनिधी त्यांना जुमानासे झाले आहेत. त्यामुळेच पक्ष प्रमुखांची भूमिका डावलून दिवा, म्हातार्डी, दातिवली, आगासन, पडले आदी गावातील सुमारे १९.४९ हेक्टर भूखंडांवरील आरक्षण हटवण्यासाठी प्रस्ताव मांडला आहे. या भूखंडांवर शाळा, रुग्णालये, प्रभाग समिती, मलउदंचन केंद्राची उभारणी करण्यात येणार होती. तर, अतिरिक्त १७.१३ हेक्टर भूखंडावर म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्टेशन उभारण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -