घरदेश-विदेशजयललितांच्या उपचारांवर नक्की किती खर्च? आता नवा वाद!

जयललितांच्या उपचारांवर नक्की किती खर्च? आता नवा वाद!

Subscribe

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांच्या उपचारांवर झालेल्या ६ कोटी ८६ लाखांपैकी ४४ लाखांची रक्कम अजूनही अपोलो हॉस्पिटलला मिळाले नसल्याचा दावा हॉस्पिटलकडून केला जात आहे.

तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्षाच्या माजी मुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्वेसर्वा स्वर्गीय जयललिता यांचं ५ डिसेंबर रोजी चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. मग त्यांच्या वारसावरून वाद झाला. नंतर त्यांच्या संपत्तीवरून वाद झाला. आणि आता त्यांच्या शेवटच्या काळात अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारांचा नक्की खर्च किती? आणि हा खर्च चुकवण्यात आला आहे का? असे प्रश्न उपस्थित करून त्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जयललिता यांच्यावरच्या उपचाराचा एकूण खर्च ६ कोटींच्या घरात गेला होता. मात्र, यातले ४४ लाख रुपये अजूनपर्यंत रुग्णालयात जमा करण्यात आले नसल्याचा दावा करण्यात येत आहे. द न्यूज मिनटने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

४४ लाख रुपयांचा हिशोब लागेना!

जयललिता यांचं निधन होऊन जवळपास २ वर्ष उलटली आहेत. उपचारांचा एकूण खर्च ६ कोटी ८६ लाखांच्या घरात गेला. पण आत्तापर्यंत त्यातले ६ कोटी ४१ लाख रुपयेच देण्यात आले असून ४४ लाख रुपये अजूनही येणे असल्याचं अपोलो हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, रुग्णालयाकडून मिळालेल्या कागदपत्रांवरून एआयएडीएमकेकडून १५ जून २०१७रोजी ६ कोटी चेक स्वरूपात जमा करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र, १३ ऑक्टोबर २०१६ रोजी जमा करण्यात आलेल्या वरच्या ४१ लाख रुपये नक्की कुठून आले? हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

- Advertisement -

डॉक्टरांचा सल्ला गेला ७१ लाखांच्या घरात!

या ६ कोटी ८६ लाखांपैकी फक्त हेल्थ केअर सर्व्हिसवर १ कोटी ९२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यापैकी नुसत्या डॉक्टरांच्या कन्सल्टेशनचेच ७१ लाख रुपये झाले आहेत. हॉस्पिटलच्या उपकरणांचं बिल ७ लाख १० हजार रुपये झालं आहे. तर हॉस्पिटलकडून देण्यात आलेल्या औषधांचं बिल ३८ लाखांच्या घरात गेलं आहे. याशिवाय साधारणपणे अडीच महिने जयललिता अपोलो हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत्या. त्यांच्या व्हीआयपी खोलीचं भाडं २४ लाख रुपये झालं आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खास लंडनहून डॉक्टर रिचर्ड बेले आले होते. त्यांची फी ९२ लाख रुपये आकारण्यात आली आहे. तर सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलला देखील विशेष सेवेसाठी १२ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.


हेही वाचा – करुणानिधी आणि जयललिता यांच्यातील विळ्या भोपळ्याचे नाते!

जेवणावर झाले १ कोटी १७ लाख खर्च

या आकडेवारीमधली सर्वात आश्चर्यकारक आणि अचंबित करणारी आकडेवारी म्हणजे खानपानावर झालेला १ कोटी १७ लाखांचा खर्च! यामध्ये फक्त जयललिता यांच्याच खाण्यावरचा खर्च नसून त्यांना भेटण्यासाठी येणारे, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, त्यांची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात थांबलेले अशा सर्वांच्या खानपानाचा खर्च आहे. याशिवाय हॉस्पिटलबाहेर सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले पोलीस, गार्ड्स, जयललितांचे सचिव, इतर सरकारी कर्मचारी वर्ग यांच्या जेवण्याचा खर्च १९ लाख रुपयांच्या घरात गेला आहे. दरम्यान, पक्षाकडून मात्र अशा प्रकारची कोणहीती रक्कम शिल्लक असल्याची माहिती नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

पक्षाच्या खजिन्यातून चुकवले पैसे!

एआयएडीएमके अर्थात अण्णा द्रमुक पक्षाकडून मात्र जनतेचा कराच्या रुपाने जमा झालेला पैसा यावर खर्च करणार नसल्याचं आधीच जाहीर करण्यात आलं होतं. त्याऐवजी सगळा खर्च पक्षाच्या खजिन्यातून चुकवण्यात आला आहे. चेकच्या स्वरूपात हा सगळा खर्च देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -