घरमुंबई'आम्ही ज्यांना हाकलले, त्यांना तुम्ही स्वीकारले'; राष्ट्रवादीची बॅनरबाजी

‘आम्ही ज्यांना हाकलले, त्यांना तुम्ही स्वीकारले’; राष्ट्रवादीची बॅनरबाजी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रसेचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबईतील भाजप कार्यालयाच्या बाहेर बॅनरबाजी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईमध्ये बॅनरबाजी केली आहे. या बॅनरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षफुटीवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षफुटीवरुन चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. ‘आम्ही ज्यांना नाकारले, हाकलले त्यांना तुम्ही स्वीकारले’, असे बॅनरमध्ये लिहिले गेले आहे. हे बॅनर मुंबईतील विजय सिंह मोहिते पाटील यांच्या घरासमोर, भाजपचे नरिमन पॉईंट्स येथील कार्यालय, शिवसेना भवन तसेच मुंबईच्या इतर ठिकाणी लावत भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

- Advertisement -

काय लिहिलं आहे बॅनरमध्ये?

‘आम्ही ज्यांना नाकारले, हाकलले त्यांना तुम्ही स्वीकारले’, असे बॅनरमध्ये लिहिले आहे. यासोबतच आपला पाळणा हलणार की लोकांची पोरं मांडीवर घेणार? असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला विचारण्यात आला आहे. दरम्यान, सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असंही त्यांनी एका ट्विटमध्ये लिहिले होते. निष्ठा, भक्ती, श्रद्धा, विचारधारा मोठ्यांच्या घरची पोरं भरलेल्या ताटातील लोणच्या सारख्या तोंडाला लावतात. रातोरात गांधीच्या मांडीवरुन उठून गोंडसेंच्या मिठीत विसावतात, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -