घरमुंबईपर्यावरण संवर्धन समिती समन्वयकांचे घर अनधिकृत

पर्यावरण संवर्धन समिती समन्वयकांचे घर अनधिकृत

Subscribe

एमआरटीपीचा गुन्हा दाखल होणार

अनधिकृत बांधकामे, रिसॉर्ट विरोधात लढणार्‍या पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांचे राहते घर अनधिकृत असल्याची नोटीस महापालिकेने बजावली असून, याप्रकरणी एमआरटीपी अन्वये कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, अनधिकृत बांधकामे, रिसॉर्ट, एमएमआरडीएच्या आराखड्याविरोधात आंदोलन उभारणारे समीर वर्तक यांचे वाघोली येथील राहते घर अनधिकृत असल्याची नोटीस पालिकेने बजावली आहे. या बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राहत्या घराच्या बांधकामाची कागदपत्रे दोन दिवसात सादर करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. अन्यथा एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात लढणार्‍या समीर वर्तक यांचे स्वतःचेच घर अनधिकृत असल्याची चर्चा केली जात आहे.

- Advertisement -

पालिकेने बजावलेल्या या नोटिसीविरोधात समीर वर्तक यांनी मात्र तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वसई-विरार महापालिका आणि सत्ताधारी आपल्या गुंड भूमाफियांना वाचवण्यासाठी हरित वसईसाठी लढणार्‍यांना खोट्या नोटिसा पाठवत आहेत. माझ्या नावावर कोणतेही घर किंवा मालमत्ता नसतानाही पालिकेने नोटीस काढली आहे. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तत्पूर्वी सोमवारी आयुक्तांची याप्रकरणी भेट घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -