घरमुंबईमुंबईत 'रोबो' करणार पर्जन्यवाहिन्यांची सफाई

मुंबईत ‘रोबो’ करणार पर्जन्यवाहिन्यांची सफाई

Subscribe

सफाई कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यापुढे रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या रोबोद्वारे पर्जन्य वाहिन्यांची सफाई केली जाणार आहे.

मुंबईतील ब्रिटीश कालीन अशा जुन्या व बंदिस्त पर्जन्यवाहिन्या सफाईमध्ये बऱ्याच अडणींचा सामना करावा लागतो. याच अडचणी लक्षात घेत आता मिनी रोबोच्या मदतीने या पाईप्सची सफाई केली जाणार आहे. या पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई मॅनहोल्समध्ये माणसाला उतरवून केली जाते. मात्र, यातील रासायनिक द्रव्यामुळे त्रास होऊन कामगारांचा मृत्यू संभवू शकतो. त्यामुळे रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या रोबोद्वारे यांत्रिक पध्दतीने ही सफाई केली जाणार आहे. मिनी रोबो’द्वारे भूमिगत वाहिन्यांची सफाई पावसाळापूर्व व पावसाळ्यानंतर अशा दोन टप्प्यांमध्ये सफाई केली जाईल. या दोन्ही टप्प्यांमध्ये भूमिगत वाहिन्यांची सफाई करण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. हा प्राधान्यक्रम ठरविताना गेल्या काही वर्षात पावसाळ्याच्या काळात पाण्याचा निचरा होण्यास लागलेल्या कालावधीचा अभ्यास करुन निर्धारित करण्यात आला आहे. यानुसार, पाण्याचा निचरा अधिक कालावधी लागलेल्या ठिकाणांशी संबंधित पर्जन्यजल वाहिन्या या ‘प्राधान्यक्रम १’ मध्ये आहेत. तर, उर्वरित वाहिन्यांचा समावेश हा पाणी निचरा कालावधीच्या उतरत्या भाजणीनुसार अन्य प्राधान्यक्रम गटांमध्ये करण्यात आला आहे.

‘या’ टप्प्यांमध्ये होणार सफाई

पावसाळापूर्व साफसफाईच्या ‘प्राध्यान्यक्रम १’ अंतर्गत समावेश असलेल्या भूमिगत वाहिन्यांमध्ये, ‘ए’ विभागातील शहीद भगतसिंह मार्ग, ‘बी’ विभागातील मियां अहमद छोटाणी मार्ग, ‘सी’ विभागातील किका रस्ता, ‘डी’विभागातील ‘बॉडीगार्ड लेन’, ‘ई’ विभागातील जहांगिर बोमन बेहराम मार्ग (बेलासिस रोड), ‘एफ दक्षिण’ विभागातील मडके बुवा चौक ते श्रावण यशवंत चौक, ‘एफ उत्तर’ विभागातील षण्मुखानंद सभागृह ते बंगाली-पुरा, ‘जी दक्षिण’ विभागातील फीतवाला लेन व सेनापती बापट मार्गाच्या जंक्शन पासून मडूरकर जंक्शन पर्यंत आणि ‘जी उत्तर’ विभागातील महात्मा गांधी मार्ग या रस्त्यांच्या खाली असणा-या पर्जन्यजल वाहिन्यांचा समावेश आहे. ‘प्राधान्यक्रम १’ अंतर्गत असलेल्या भूमिगत वाहिन्यांची साफसफाई झाल्यानंतर इतर वाहिन्यांची साफसफाई ही निर्धारित प्राधान्यक्रमानुसार करण्यात येणार आहे.

- Advertisement -
Now Robot will clean Water Outlasts in Mumbai
सीसीटीव्ही कॅमेरा आणि मॉनिटर ठेवणार कामावर लक्ष

‘सीसीटीव्ही’ ठेवणार नजर

या वर्षापासून भूमिगत वाहिन्यांच्या आत जाऊन सफाई करणारे ‘मिनी रोबो’ हे अत्याधुनिक यंत्र उपयोगात आणले जाणार आहे. ज्यामुळे भूमिगत स्वरुपाच्या पर्जन्यजल वाहिन्यांची अंतर्गत सफाई ही पहिल्यांदाच होणार आहे. याबाबत संबंधित निविदेतील अटी व शर्तींनुसार निविदा बहाल झालेल्या कंपनीने’मिनी रोबो’ या अत्याधुनिक यंत्राचे २ नग खरेदी केले आहेत. तर महापालिकेने देखील हे १ यंत्र खरेदी केले आहे. ही तिन्ही यंत्रे ‘नवीन वर्ष २०१९’ मध्ये पावसाळापूर्व साफसफाईसाठी उपयोगात आणली जाणार आहेत. या यंत्रावर असणाऱ्या ‘सीसीटिव्ही कॅमेरा’द्वारे प्राप्त होणारी थेट दृश्ये पाहून, यंत्र कुठे वळवायचे व त्याचा वापर कसा करावयाचा? याचा निर्णय दूरनियंत्रक चालकास घेता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -