घरमुंबईसमेळगाव गर्दुल्यांच्या विळख्यात

समेळगाव गर्दुल्यांच्या विळख्यात

Subscribe

नगरसेवकाकडून पोलिसांना कारवाईचे निवेदन

नालासोपारा पश्चिमेकडील समेळगावाला गर्दुल्यांनी विळखा घातला आहे. या गर्दुल्ल्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवकाने केली आहे.

समेळगावातील सेंचुरी लोटस इमारत, लिटील फ्लॉवर शाळेचे श्याम कुटीर मागील मैदान, स्काय व्ह्यु अपार्टमेंट, विणा सोसायटीच्या मागील मैदान, सम्राट कॉर्नर, सुविधा इमारतीच्या मागून श्री प्रस्थाला जाणारा रस्ता या परिसरात गर्द पिणारे टोळीटोळीने बसलेले असतात. येणार्‍या जाणार्‍यांना शिविगाळ करणे, अंगावर धावून जाणे असे प्रकार त्यांच्याकडून होत आहेत. या परिसरात लिटील फ्लॉवर शाळा, सोपारा इंग्लिश स्कूल, कोचींग क्लासेस, अंगणवाडी, पाळणा घरे असल्याने मुली आणि स्त्रियांची नेहमी लगबग असते, त्यांना या नशेखोरांची भीती आहे.

- Advertisement -

या गर्दुल्यांवर कारवाई करून त्यांना या परिसरातून हाकलून लावण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक राजेश ढगे यांनी नालासोपारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक लब्दे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. सम्राट अशोकनगर फेडरेशनचे अध्यक्ष अनिल जाधव, बहुजन विकास आघाडीचे वॉर्ड अध्यक्ष राजेंद्र खुळे, सुखकर्ता मित्र मंडळाचे अध्यक्ष अंकित ढगे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -