घरमुंबईराज्यात आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ

राज्यात आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ

Subscribe

प्रतिनिधी:-वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना 25 टक्के शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मिळणार्‍या प्रवेशामध्ये यावर्षी वाढ झाली असली तरी यंदा राज्यात 51 हजार 849 जागा शिल्लक राहिल्या आहेत. लांबलचक चाललेली प्रवेश प्रक्रिया आणि अपुरे मार्गदर्शन यामुळे चार फेर्‍या होऊनही पालकांनी आरटीईच्या प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. सर्वाधिक रिक्त जागा ठाणे, मुंबई, पुणे आणि पालघर या जिल्ह्यात आहेत. ठाण्यात 10 हजार तर पुणे, मुंबईत 4 हजार जागा रिकाम्या आहेत.

आरटीईअंतर्गत अधिकाधिक प्रवेश देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी लांबलचक प्रवेश प्रक्रिया, हव्या असलेल्या शाळेत प्रवेश न मिळणे यामुळे अर्ज दाखल केल्यानंतरही बहुतेक पालक प्रवेश घेणे टाळतात. त्यामुळे यावर्षी चार फेर्‍या होऊनही राज्यात अनेक जागा रिक्त आहेत. न्यायालयीन निर्णय आणि प्रवेशाला प्रतिसाद न मिळाल्याने वारंवार होणारी मुदतवाढ यामुळे अनेक पालकांनी प्रवेश प्रक्रियेकडे दुर्लक्ष केल्याने यंदा प्रवेश प्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्यात 10817 जागा रिक्त आहेत. मुंबईत 4821 जागा तर पुण्यात 4196 आणि पालघर 3166 तर औरंगाबाद जिल्ह्यात 2661 जागा रिकाम्या असल्याची माहिती आरटीईच्या संकेतस्थळावर दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -