लोकल रेल्वे प्रवासाबाबत ठाकरे सरकारची ही मागणी मान्य

mumbai local train

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने मुंबई आणि उपनगरातील शिक्षकांना उपनगरीय लोकल प्रवासाची मुभा देण्यांतआली आहे. त्यामुळे शिक्षकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.शाळेमध्ये शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती आणि २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र शिक्षकांना शाळेत वेळेवर पोहचण्यासाठी वाहतूक व्यस्था उपलब्ध नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेला पत्र लिहून

शिक्षकांना लोकलने प्रवासाची मुभा देण्याची विनंती केली होती. त्यावर मध्य आणि पश्चिम रेल्वेने शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा दिली आहे.लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक वाहतूक फक्त कोरोना योद्धयांसाठीच सुरू होती. मात्र अशाही परिस्थितीमध्ये उत्तरपत्रिका तपासणे, परीक्षांचे निकाल जाहीर करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना तारेवरची कसरत करून शाळा गाठावी लागत होती. शिक्षकांना लोकलमध्ये प्रवेशाची मुभा देण्यात यावी अशी मागणी शिक्षक व शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु आता नुकताच शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणासाठी राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यातच २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेमध्ये येता यावे, यासाठी राज्य सरकारच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागाकडून मध्य व पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले होते. राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेला लिहिलेल्या पत्रामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना शाळेत येता यावे यासाठी लोकलने प्रवेश करण्याची मुभा देण्याची विनंती केली आहे. या विनंतीलामध्य आणिपश्चिम रेल्वेने मुंबई आणि उपनगरातील शिक्षकांना उपनगरीय लोकल प्रवासाची मुभा देण्यांतआली आहे.