घरमुंबईदिव्यांग सेना शिकवणार शिवसेना- भाजपला धडा!

दिव्यांग सेना शिकवणार शिवसेना- भाजपला धडा!

Subscribe

आंदोलन करणाऱ्या दिव्यांगावर लाठीचार्ज करून मारहाण केली जाते. त्यामुळे शिवसेना- भाजपाविरोधात त्यांच्या रोष असल्याचे, दिव्यांग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी सांगितले.

दिव्यांगांना आपल्या न्याय हक्कासाठी अनेकवेळा आंदोलनं करावी लगातात. मात्र, पोलिसांकडून दिव्यांगांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला जातो. नुकताच पुण्यात दिव्यांगावर पोलिसांकडून अमानुष लाठीमार केला होता. या प्रकरणामुळे दिव्यांगामध्ये सध्या सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र संताप आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि सत्ताधारी भाजपला धडा शिकविण्यासाठच राज्यातील दिव्यांग, हे  दिव्यांग सेनेच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. दिव्यांग सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, येत्या २४ मार्चला दिव्यांग सेनेकडून भूमिका मांडली जाणार आहे.
भांडूप येथील संघर्ष कार्यालयात दिव्यांग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील व ठाणे जिल्हयातील पदाधिकारी उपस्थित होते.

आपलं महानगर इम्पॅक्ट : केडीएमसीकडून धडक कारवाई

आतापर्यंत कोणत्याही पक्षाच्या खासदाराने दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्यासाठी कधीही  पुढाकार घेतलेला नाही. संसदेत आवाजदेखील उठविलेला नाही. त्यामुळे दिव्यांग सेनेचे उमेदवार उभे करण्याची मागणी पदाधिकारी व कार्यकत्यांकडून करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, सिंधुदुर्ग, जळगाव परभरणी या मतदारसंघातून लढण्यास अनेकांनी इच्छुकता दर्शविली आहे. राज्यात ७० लाख दिव्यांग आहेत तर ठाणे जिल्हयात अडीच ते तीन लाख दिव्यांग आहेत. दिव्यांगांना रोजगारासाठी झगडावे लागते. आंदोलन करणाऱ्या दिव्यांगावर लाठीचार्ज करून मारहाण केली जाते. दिव्यांगाचे प्रश्न सोडवले जात नाहीत. त्यामुळे शिवसेना भाजपाविरोधात रोष असल्याचे साळवी यांनी सांगितले. दिव्यांगात अनेक प्रकार आहेत. मात्र, मुक- कर्णबधीर आणि अंधाची मतदार नोंदणी कशी केली जाते? याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे, अशी मागणी केली आहे. दिव्यांगांना मतदानापासून वंचित ठेवले जात असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -