घरमुंबईचोरांना पकडण्यासाठी पोलिसांची फिल्मी स्टाईल

चोरांना पकडण्यासाठी पोलिसांची फिल्मी स्टाईल

Subscribe

कल्याणमध्ये धान्य व्यापऱ्याला लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे.

एका व्यापा-याला लुटण्यासाठी आलेल्या चौकडीला पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. फिल्मी स्टाईलने त्या चौकडीच्या गाडीचा पोलिसांनी पाठलाग करून त्यांनी अटक केली आहे. केवळ भरधाव गाडी नेल्यानेच पेालिसांना त्यांचा संशय आला होता त्यामुळेच पोलिसांनी त्यांचा पाठलाग आणि एका टोळी पोलिसांच्या जाळयात अडकली. त्यामुळे पोलिसांच कौतूक होत आहे. चेतन राऊत, जुनेद शेख, तौसिफ शेख आणि इस्माईल गाडीवाला असे या चौघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून धारदार शस्त्र जप्त केली आहेत.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान एका धान्याच्या व्यापा-याला लुटण्यासाठी लाल रंगाच्या कारमधून येणार असल्याची माहिती कल्याण पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली हेाती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रत्येक वाहनावर करडी नजर ठेवली होती. याचवेळी संध्याकाळच्यासुमारास एक लाल रंगाची कार भरधाव वेगाने गेल्याचे बंदोस्तावरील पोलिसांच्या निदर्शना आले. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला. ती गाडी थांबविल्यानंतर त्यात पाचजण बसल्याचे आढळून आले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यातील एक जण पोलिसांनी झटका देऊन पसार झाला.

- Advertisement -

पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली असता गाडीत एक चॉपर, तलवार, एक गुप्ती, नायलॉन दोरी आणि मिरची पूड व सेलो टेप हे साहित्य आणि शस्त्रास्त्रे आढळून आली. पोलिसांनी त्यांना अटक करून, पोलीसी हिसका दाखवता ते पोपटासारखे बोलू लागले. धान्य व्यापा-याला लुटण्यासाठी आल्याची कबुली त्यांनी दिली. या चौघांपैकी तौसिफ शेख आणि इस्माईल गाडीवाला हे दोघे सराईत गुन्हेगार असून इस्माईला तडीपार आहे यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीय येण्याची शक्यता  बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -