घरमुंबईभिवंडी लोकसभा मतदारसंघात पुन्हा राजकीय बदलाचे वारे

भिवंडी लोकसभा मतदारसंघात पुन्हा राजकीय बदलाचे वारे

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. शहरी व ग्रामीण भाग असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आहे. आगरी-कुणबी समाजाचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ भाजपने काँग्रेसकडून खेचून आणला आहे. ऐन निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादी काँगेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले कपिल पाटील हे खासदार झाले. मनसेचे सुरेश म्हात्रे हे शिवसेनेच्या गोटात दाखल झाले आहेत. शिवसेना आणि भाजप युती होण्याची चिन्हे धूसर दिसत आहेत. युती न झाल्यास भिवंडीत भाजपला मोठा फटका बसू शकतो. मागील निवडणुकीत राजकीय बदलाच्या अनेक घडामोडी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे यावेळीही राजकीय घडामोडींच्या गुप्त चर्चा पडद्याआड सुरू आहेत. त्यामुळे भिवंडीत राजकीय बदलाचे वारे वाहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भिवंडी या महत्त्वपूर्ण शहराची ओळख यंत्रमाग उद्योग नगरीमुळे मँचेस्टर म्हणून केली जाते. २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत भिवंडी हा लेाकसभा नव्याने तयार झाला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले कपिल पाटील हे खासदार म्हणून निवडून आले. कुणबी सेनेचे संस्थापक विश्वनाथ पाटील यांचा तब्बल १ लाख ०९ हजार ४५० मतांनी पराभव झाला, तर मनसेचे सुरेश म्हात्रे यांना ९३ हजार ६४७ मतं मिळाली. मोदी लाटेचा फायदा भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठ्या प्रमाणात झाला. कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड, भिवंडी, वाडा तालुक्याचा परिसर या मतदारसंघात येतो. शहरी व ग्रामीण असा दोन्ही परिसराचा या मतदारसंघात समावेश आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात मुरबाड, कल्याण पश्चिम, भिवंडी पश्चिम या तीन मतदारसंघात भाजपचे तर भिवंडी ग्रामीण आणि भिवंडी पूर्वमध्ये शिवसेना, शहापूरमध्ये राष्ट्रवादी असे आमदार निवडून आले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती होऊन एकत्रितपणे लढवल्या असल्या तरीसुध्दा विधानसभा निवडणुकीत दोघांनी स्वतंत्रपणे लढवल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेत एकत्र तर विधानसभेत स्वतंत्रपणे लढले होते.

- Advertisement -

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपने तर भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने आघाडी घेतली हेाती. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाली होती. त्यामुळे ते एकत्रितपणे लढले. यंदा मात्र युतीसंदर्भातील आशा धूसर होत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे शिवसेनेतर्फे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि जिल्हा परिषद सभापती सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे हे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे. यंदा राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात झाली आहे. मनसेतून निवडणूक लढवणारे बाळ्या मामा म्हात्रे यांना ९३ हजार ६४७ मतं मिळाली होती. मात्र, निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. काँग्रेसने विद्यमान खासदार सुरेश टावरे यांचे तिकीट कापून थेट कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांनी रिंगणात उतरवले होते. मात्र, काँग्रेसकडून टावरे हे सुध्दा प्रबळ दावेदार समजले जात आहेत. भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम या दोन मतदारसंघात मुस्लीम अल्पसंख्याक मतांचे प्रमाणे हे ६० टक्के आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही या दोन विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने मताधिक्य घेतलं होतं. त्यामुळे हे दोन मतदारसंघ काँग्रेसला पोषक आहेत.

२०१४ च्या निवडणुकीचा निकाल

- Advertisement -

उमेदवार मते
कपिल पाटील (भाजप) : ४ लाख ११ हजार ७०
विश्वनाथ पाटील (काँग्रेस) : ३ लाख १ हजार ६२०
सुरेश म्हात्रे (मनसे ) : ९३ हजार ६४७

संभाव्य उमेदवार

भाजप : कपिल पाटील
शिवसेना : प्रकाश पाटील, सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे
काँग्रेस : सुरेश टावरे, विश्वनाथ पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस : गोटीराम पवार, पांडूरंग बरोरा, इरफान भुरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -