मुंबईची बत्ती गुल आणि मिम्सचा शॉक

Power supply cut memes viral

मुंबई आणि उपनगरात आज सकाळी वीज पुरवठा खंडित झाला. मुंबईतील दहीसर, चेंबूर, प्रभादेवी, मालाड, कांदिवली, बांद्रा, विले पार्ले, पवई या भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. टाटाकडून होणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाले असल्याचे ट्विट बेस्ट कडून करण्यात आले आहे. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर येथील उपकेंद्रामधील पॉवर ग्रीड आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रीपिंग झाल्यामुळे संपुर्ण मुंबईचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. मुंबईच्या उपनगरांना ३६० मेगावॅटचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीला फटका बसल्यामुळे मुंबईकरांची सोमवारी सकाळी चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. यावर आता सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला.