नवी मुंबई विमानतळाचे काम पाडले बंद; प्रकल्पग्रस्तांची धरपकड

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून नवी मुंबई विमानतळाचे काम देखील बंद पाडले आहे.

Mumbai
protest against navi mumbai airport several protesters arrested in navi mumbai
नवी मुंबई विमानतळाचे काम पाडले बंद

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. प्रकल्पबाधित आज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले आहेत. त्यांनी आक्रमक होत विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले आहेत. एवढेच नाहीतर त्यांनी विमानतळ सुरु असलेले काम देखील बंद पाडले आहे.

अनेक प्रकल्पबाधीतांना अटक

वाघिवली येथे २३ जानेवारीपासून प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष अनिल पाटील आणि अखिल भारतीय किसान सभेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. आंदोलना दरम्यान, प्रकल्पग्रस्तांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांची धरपकड केली आहे. यावेळी अनेक प्रकल्पबाधीतांना अटक देखील करण्यात आली आहे. यावेळी प्रकल्पग्रस्तांकडून सिडकोने आमची फसवणूक केल्याचा आरोप केला. आज या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतला होता. अखेर त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आहे.


हेही वाचा – BMC Budget 2020 : पंपिंग स्टेशन उभारणीऐवजी गेट पंप्स बसवणार