घरमुंबई७२ तासांत खड्डे बुजवणार; पीडब्ल्यूडीचे मनसेला आश्वासन!

७२ तासांत खड्डे बुजवणार; पीडब्ल्यूडीचे मनसेला आश्वासन!

Subscribe

पीडब्ल्यूडीने खड्डे दुरुस्तीच्या कामात उशीर झाला असल्याचे मान्य केले आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील खड्ड्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे आश्वासन पीडबल्यूडीने मनसेला दिले आहे.

मुंबईच्या वांद्रे ते अंधेरीदरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डे दुरुस्तीच्या कामाला विलंब झाला आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करणार असल्याची हमी पीडब्ल्यूडीने मनसेला दिली आहे. पीडब्ल्यूडीने याबाबतीत मनसेला हमीपत्र दिले आहे. मनसेच्या आंदोलनाच्या दणक्याने पीडब्ल्यूडीला जाग आली असल्याचे मनसेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अखिल चित्रे यांनी म्हटले आहे.

पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

पश्चिम द्रुतगती मार्ग हा वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे ह्या रस्त्यावर खूप खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येकडे पीडब्ल्यूडी लक्ष देत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग झोपी गेला आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

- Advertisement -

मनसेने पाठवले होते पत्र

या रस्त्यावरील खड्डयांमुळे मुंबईकर मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून ७२ तासांत खड्डे बुजवले नाहीत, तर आनंदोलनाचा इशारा दिला होता. ‘या रस्त्याची तात्काळ डागडुजी झाली नाही तर तुमच्या कर्तृत्वाचे जाहीर प्रदर्शन तर मांडूच पण मनसे दणका देऊ’, अशा आशयाचं एक पत्र मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलं होतं.

mns letter to pwd
मनसेने पीडब्ल्यूडीला पाठवले होते पत्र

पीडब्ल्यूडीचे मनसेला आश्वासन

सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या ७२ तासांत या रस्त्यातील खड्डे बुजवायचं आश्वासन दिलं आहे. खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर केलं जाईल, असंही पीडब्ल्यूडीने मनसेला दिलेल्या हमीपत्रात नमूद केलं आहे. त्याचबरोबर खड्डे बुजवण्याला उशिर झाल्याचे पीडब्ल्यूडीने या पत्रात मान्य केले आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -