घरमुंबई'लाव रे तो व्हिडिओ'च्या मागचे कलाकार; मुंबईच्या डिजिटल रथ राज्याव्यापी दौऱ्यावर

‘लाव रे तो व्हिडिओ’च्या मागचे कलाकार; मुंबईच्या डिजिटल रथ राज्याव्यापी दौऱ्यावर

Subscribe

डिजिटल स्क्रिनवरील सादरीकरणासाठी विशेष टीम राज ठाकरे यांच्यासोबत राज्यभर प्रवास करत आहे. मुंबईतूनच हा डिजिटल स्क्रिन असलेला ट्रक राज्याच्या दौऱ्यावर आहे.

‘लाव रे व्हिडिओ’, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्यानंतर आज काय पोलखोल होणार याकडेच लक्ष लागून राहते. व्हिडिओच्या निमित्ताने सगळ्यांच्या नजरा मोठ्या डिजिटल स्क्रिनवर लागतात. पण व्हिडिओ प्रेझेंटेशनसाठी सध्या राज्यभरातील दौऱ्यांसाठी हे डिजिटल स्क्रिन मुंबईतून प्रत्येक शहरासाठी प्रवास करत आहेत. मनसेच्या राज्यातील सहा सभांसाठी हा सगळा फौजफाटा मोदी आणि शहा यांच्याविरोधातील प्रचारामध्ये उतरला आहे.

राज्यातील सर्व सभांमध्ये वापर 

राज ठाकरे यांच्या सभांमध्ये युतीच्या काळातील योजनांचे पोस्टमार्टम करण्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. पण या पोलखोलशी संबंधित भाषणांना आता आधार घेतला जात आहे, तो म्हणजे डिजिटल स्क्रिनचा. या सगळ्या डिजिटल स्क्रिनवरील सादरीकरणासाठी विशेष टीमदेखील राज ठाकरे यांच्यासोबत राज्यभर प्रवास करत आहे. मुंबईतूनच हा डिजिटल स्क्रिन असलेला ट्रक राज्याच्या दौऱ्यावर आहे. आतापर्यंत राज ठाकरे यांच्या राज्यभरातील सभांमध्ये इचलकरंजी, सोलापूर, नांदेड यासारख्या सभांसाठी हे डिजिटल स्क्रिन वापरण्यात आले आहेत. तर सातारा, पुणे आणि रायगड येथील सभांसाठीही या डिजिटल स्क्रिनचा वापर करण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या सभांसाठी या डिजिटल स्क्रिनसह हे संपुर्ण प्रेझेंटेशन हाताळणाऱ्यांची टीमही प्रवास करत आहे. वेळोवेळी या प्रेझेंटेशनमध्ये नवनवीन माहितीची भर घालण्यासाठीही ही टीम मेहनत घेत आहे.

- Advertisement -

भाजप सरकारची डिजिटल खेड्याची संकल्पनेचा पोलखोल करणारा व्हिडिओ हा पाडवा मेळाव्यापासूनच मोठ्या प्रमाणात शेअर आणि व्हायरल झालेला आहे. सोलापूरच्या सभेत या योजनेतला लाभार्थीच राज ठाकरे यांनी स्टेटवर जनतेसमोर जाहीर केला होता. त्यामुळे लाव रे तो व्हिडिओ या नावाने विरोधकांनाच धसका बसला आहे. प्रत्येक सभेच्या निमित्ताने विशेषतः नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ हे जनतेसमोर पहायला मिळत आहे. मनसेने लोकसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदा झालेल्या वांद्रे रंगशारदा येथील मनसैनिकांच्या कार्यकर्ता मेळाव्यात याबाबती रंगीत तालीम झाली होती.

राज ठाकरे

ठाणे मनपा निवडणुकांमध्ये पहिल्यांदा वापर

राज ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेला नाशिकचा विकास दाखवण्यासाठी मनसेने २०१७ मध्ये ठाणे महापालिका निवडणुकांमध्ये डिजिटल स्क्रिनचा वापर केला होता. त्यावेळी नाशिकमध्ये झालेली विकास कामे ही डॉक्युमेंट्रीच्या रूपात दाखविण्यात आली होती. या प्रयोगानंतरच आता लोकसभेसाठी अशा डिजिटल स्क्रिनचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याची सुरूवात पक्षाकडून झाली आहे. मनसे पक्षाकडून या डिजिटल स्क्रिन राज्यातील सभांसाठी म्हणून आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही अशाच पद्धतीने वापरण्यात येणार आहेत.

- Advertisement -

‘लाव रे तो व्हिडिओ…’ ट्रेंड, ट्रोल

भाजपच्या ‘मै भी चौकीदार’ कॅम्पेनसारखच ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे कॅम्पेन आता मनसैनिकांनी ट्विटरवर सुरू केले आहे. पण राज ठाकरे यांच्या या कॅम्पेनचा ट्विटरवर जोरदार समाचार घेत ट्रोलिंग करण्यात आले आहे. त्यामध्ये राज ठाकरेंचा गुजरात दौरा, बंद पडलेल्या बांधकामाचे व्हिडिओ दाखवा, टोल नाक्याचा व्हिडिओ, ‘रईस’ आणि ‘ए दिल है मुश्कील’च्या वेळी मांडवली करण्याचा व्हिडिओ यासारखे मुद्दे घेऊन मनसेला ट्रोल करण्यात आले आहे. काही ट्विटर वापरकर्त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना साडी चोरणारे म्हणत या मुद्द्यावरही ट्रोल केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -